Home Latest News तालुका अधिकाऱ्यांची शिवार फेरी

तालुका अधिकाऱ्यांची शिवार फेरी

0
136

ग्रामीण भागातील शिव पांदन व अंतर्गत रस्ते जोडण्याची गरज

संदीप बलवीर, टाकळघाट १२  :- ग्रामीण भागातील शेतकरी, जनता हे विविध समस्येने ग्रासलेले असल्याचे चित्र आपल्याला नेहमीच दिसून येते.अनेक खेड्यातील शेतकऱ्यांना शेतात जायला पांधण रस्ता राहिला नसून यांच्या पांधण रस्त्यावर मोठ्या धंदडाग्यानी अतिक्रमण करून दरोडा टाकला असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दृष्टीपथास पडते. शेतकऱ्यांना शेतात जाण्यास रस्ता शिल्लक राहत नसल्याने त्यांना दरवर्षी उत्पादनातून लाखो रुपयाचे नुकसान सोसावे लागत असतें.
विशेष बाब अशी की,जमीन महसूल कायदा १९६६ प्रमाणे शेतकऱ्यांना शेतावर जाण्याकरिता रस्ता मिळणे हा त्यांचा हक्क असून त्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक जवाबदारी आहे. या अनुषंगाने २५ मे २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रका नुसार शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी, शेतात मोठी कृषी अवजारे, ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर घेऊन जाण्यासाठी व शेतातील कच्चा व पक्का माल जलद गतीने बाजारपेठेत पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांना १२ फुटाचा शेतरस्ता असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. सोबतच महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत बोलतांना ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यास १२ फुटाचे शेत रस्ते नाहीत त्यांना ते तात्काळ देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.याच अनुषंगाने हिंगना तालुका अंतर्गत ग्रामपंचायत खडकी अंतर्गत परिसरातील शिव पांदन रस्ते तसेच दोन गावांना जोडणारे रस्ते अशा रस्त्याची पाहणी करण्याकरिता शिवार फेरी करण्यात आली. या शिवार फेरीत हिंगणा तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आर डगाले, ग्राम महसूल अधिकारी राजेश बोलीवार, वृषभ गुंडे, ग्रामपंचायत अधिकारी गोपाळ जाधव, ग्रा प सरपंच अर्चना धुर्वे, ग्रा प सदस्य रवींद्र काटवे, ग्रापं कर्मचारी प्रदीप डवरकर, कोतवाल किशोर काटवे, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी अरुण कुणघाटकर, नरेश निकुरे, दशरथ मरस्कोल्हे, संजय मसराम, पोलीस पाटील प्रफुल निकुरे, सीमा भगत, विजय जवादे, माया काटवे, जयश्री मरस्कोल्हे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तालुका महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी भविष्यात शेतापर्यंत जाण्याचा प्रश्न कसा सोडविता येईल त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यावर शेतकऱ्यांशी विस्तृत चर्चा केली