Home Latest News तालुका अधिकाऱ्यांची शिवार फेरी

तालुका अधिकाऱ्यांची शिवार फेरी

0

<p><strong>ग्रामीण भागातील शिव पांदन व अंतर्गत रस्ते जोडण्याची गरज<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>संदीप बलवीर&comma; टाकळघाट १२  &colon;-<&sol;strong> ग्रामीण भागातील शेतकरी&comma; जनता हे विविध समस्येने ग्रासलेले असल्याचे चित्र आपल्याला नेहमीच दिसून येते&period;अनेक खेड्यातील शेतकऱ्यांना शेतात जायला पांधण रस्ता राहिला नसून यांच्या पांधण रस्त्यावर मोठ्या धंदडाग्यानी अतिक्रमण करून दरोडा टाकला असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दृष्टीपथास पडते&period; शेतकऱ्यांना शेतात जाण्यास रस्ता शिल्लक राहत नसल्याने त्यांना दरवर्षी उत्पादनातून लाखो रुपयाचे नुकसान सोसावे लागत असतें&period;<br &sol;>&NewLine;विशेष बाब अशी की&comma;जमीन महसूल कायदा १९६६ प्रमाणे शेतकऱ्यांना शेतावर जाण्याकरिता रस्ता मिळणे हा त्यांचा हक्क असून त्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक जवाबदारी आहे&period; या अनुषंगाने २५ मे २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रका नुसार शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी&comma; शेतात मोठी कृषी अवजारे&comma; ट्रॅक्टर&comma; रोटावेटर&comma; हार्वेस्टर घेऊन जाण्यासाठी व शेतातील कच्चा व पक्का माल जलद गतीने बाजारपेठेत पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांना १२ फुटाचा शेतरस्ता असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे&period; सोबतच महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत बोलतांना ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यास १२ फुटाचे शेत रस्ते नाहीत त्यांना ते तात्काळ देण्यात येईल अशी घोषणा केली आहे&period;याच अनुषंगाने हिंगना तालुका अंतर्गत ग्रामपंचायत खडकी अंतर्गत परिसरातील शिव पांदन रस्ते तसेच दोन गावांना जोडणारे रस्ते अशा रस्त्याची पाहणी करण्याकरिता शिवार फेरी करण्यात आली&period; या शिवार फेरीत हिंगणा तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आर डगाले&comma; ग्राम महसूल अधिकारी राजेश बोलीवार&comma; वृषभ गुंडे&comma; ग्रामपंचायत अधिकारी गोपाळ जाधव&comma; ग्रा प सरपंच अर्चना धुर्वे&comma; ग्रा प सदस्य रवींद्र काटवे&comma; ग्रापं कर्मचारी प्रदीप डवरकर&comma; कोतवाल किशोर काटवे&comma; सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी अरुण कुणघाटकर&comma; नरेश निकुरे&comma; दशरथ मरस्कोल्हे&comma; संजय मसराम&comma; पोलीस पाटील प्रफुल निकुरे&comma; सीमा भगत&comma; विजय जवादे&comma; माया काटवे&comma; जयश्री मरस्कोल्हे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते&period; यावेळी तालुका महसूल विभागाचे मंडळ अधिकारी&comma; ग्राम महसूल अधिकारी यांनी भविष्यात शेतापर्यंत जाण्याचा प्रश्न कसा सोडविता येईल त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यावर शेतकऱ्यांशी विस्तृत à¤šà¤°à¥à¤šà¤¾ à¤•ेली<&sol;p>&NewLine;

Exit mobile version