Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या कांग्रेसला धडा शिकवा – अनिल निधान

कामठी :- कांग्रेस पक्षाने नेहमीच महिला सक्षमीकरनात अडथळे आणण्याचे काम केले आहे.या नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून कांग्रेसने आपला महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.महिलांनी आपल्या हक्कांसाठी जागृत होऊन या विधेयकाला विरोध करणाऱ्या कांग्रेसला धडा शिकवा असे आवाहन भाजपा चे वरिष्ठ पदाधिकारी ,नागपूर जिल्हा परिषद चे माजी सदस्य अनिलभाऊ निधान यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महिलांना संसदेत आणि विधानसभा मध्ये 33 टक्के आरक्षण देणारा ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर केला आहे मात्र या विधेयकाला कांग्रेस पक्षाने नकार दिला.महिला आरक्षणास विरोध करून विरोधकांनी आपली महिलाविरोधीमानसिकता उघड केली असून त्याचा भाजप तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे.महिला आरक्षणाला अडथळे निर्माण करणारे पक्ष केवळ एका विधेयकाचा नव्हे तर संपूर्ण स्त्रीशक्तीचा अपमान करत आहेत.,हा अपमान भाजप कदापिही सहन करणार नाही.अशी तीव्र भावना भाजप पदाधिकारी अनिल निधान यांनी प्रस्तुत प्रस्तुनिधींशी बोलताना व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.