Home Latest News जि प प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे शिक्षक दिन साजरा 

जि प प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे शिक्षक दिन साजरा 

0
70
किशोर साहू :मौदा, ता. ८ : तालुक्यातील जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  अंकुश निरगुळकर ,उपाध्यक्ष  प्रल्हाद वैद्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु. पठाण तबस्सुम , ग्रामपंचायत सदस्य   काशिनाथ गिर्हेपुंजे, शाळेच्या  स्वयंपाकी शोभाताई बावणे आणि अंगणवाडी सेविका ज्योती वाडीभस्मे यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी  डॉ  सर्वपल्ली  राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी थारक्ष देशमुख आणि साची वैद्य यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडत शाळेचा कार्यभार सांभाळला. याप्रकरणी शिक्षकाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.