नागपूर :- 14 डिसेंबर रोजी रवींद्र नगर येथील, रवींद्र सभागृहात नुकतीच ब्राह्मण सेवा मंडळ, नागपूर ची वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम “वंदे मातरम्” हे राष्ट्रगान सांघिक गायिले गेले. अतिथी व कार्यकारिणीने भगवान परशुराम यांचे पुष्प अर्पण करून सभेला प्रारंभ केला. मागच्या वर्षीचा गोषवारा सचिव हेमंत पडळकर यांनी कथन केला. तदोपरांत मंडळाचे कोषाध्यक्ष आनंद बडे यांनी ऑडिट रिपोर्ट प्रस्तुत केला. उपस्थित सदस्यांनी येणाऱ्या वर्षाच्या योजना, व्यवहार आणि आय- व्ययाच्या नियोजनांवर एक मुखाने संमती दिली यानंतर ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष मिलिंद निमदेव यांचे अध्यक्षीय उद्बोधन झाले. त्यांनी गतवर्षीचा आलेख प्रस्तुत केला. तसेच पुढल्या वर्षी साठी निर्धारित केलेले लक्ष, समाजाला पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि मदत याची प्रस्तुती दिली. नुकत्याच विस्तृत झालेल्या कार्यकारणीतील नवीन सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. उपस्थित सदस्यांकडून सूचना मतप्रदर्शन व अपेक्षा स्वीकारण्यात आल्यात. विविध क्षेत्रातील नामांकित असलेल्या अतिथींचा सत्कार करण्यात आला. IIT त B.Tech उपाधी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या अमेय सुबोध देशमुख या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन प्रतिमा टेंभुर्णीकर यांनी केले. याच सभेत समाजातील विविध क्षेत्राच्या प्रतिनिधींनीही आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यक्रमात येण्याचे निमंत्रण दिले. ब्राह्मण सेवा मंडळ समाजाच्या उत्थानासाठी सार्थक प्रयत्न करीत आहे असे मत बहुतांश सदस्यांनी अनौपचारिकपणे व्यक्त केले. याप्रसंगी नवीन कार्यकारिणी स्थापित करण्यात आली. मिलिंद निमदेव अध्यक्ष, सतिश मुंडले उपाध्यक्ष, हेमंत पडळकर सचिव, राधिका बाकरे सहसचिव, आनंद बडे कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य अभय राजंदेकर, रविंद्र जोशी, संजय जोशी, किरण पथे, दिनेश टेकाडे, प्रणिता देशमुख, दिलीप चंद्रायन, हेमंत देशपांडे, श्रीराम महांकाळीवार, प्रविण डोळस, नहुष सहस्त्रबुद्धे, श्रीपाद चोरघडे, प्रतिमा टेमुर्नीकर, उज्वल जोशी, चंद्रशेखर गावपांडे यांची उपस्थिती होती.
ब्राह्मण सेवा मंडळ नागपूर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



