कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक मासाचा शुभारंभ होताच काकड आरतीला सुरुवात करण्यात आली त्यानुसार प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या दुर्गादेवी नगर येथील हनुमान मंदिरात दररोज पहाटे होणाऱ्या काकड आरतीने कामठी शहर तसेच दुर्गादेवी नगर परिसरात संपूर्ण भक्तिमय वातावरण पसरले.
दुर्गादेवी नगर येथील हनुमान मंदिर परिसरात पहाटे होताच थोरमोठ्यापासून ते बच्चे कंपनी भल्या पहाटे स्नान करून या काकड आरतीत सहभागी होत आहेत तर पहाटेच्या प्रहारी मंदिरातील घंटा आणि काकड आरतीने मंदिरात स्वर गुंजायला लागले आहेत.यामध्ये अध्यात्मिक संस्कार पुढील पिढीकडे रुजले जावे आणि संस्कृती परंपरेने चालत राहावी हा त्या काकड आरती मागील मुख्य उद्देश असतो म्हणूनच बच्चे कंपनी ही भल्या पहाटे आंघोळ करून काकड आरतीत सहभागी होऊन हजेरी लावतात.
कामठी शहरात कोजागिरी पोर्णिमेनंतर काकड आरतीची परंपरा आजही जपली जात आहे.हिवाळ्यात आल्हाददायी वातावरण असते पहाटेच्या वातावरणात ऑक्सिजन चे प्रमाण अधिक असते तर या वतावरणामुळे मानवाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते हे इथं विशेष!
दर पहाटे होणाऱ्या या काकड आरतीतश्री काशिनाथ प्रधान माजी उपाध्यक्ष नगर परिषद कामठी तुषार बोंबाटे मोहन मते,नरेंद्र सार्वे, सुरेंद्र सार्वे, प्रवीण सार्वे,दक्ष राऊत, रोहित ठावकर, विनोद काटकर, कार्तिक बोंबाटे, सार्थक मेरखेड, ओजस प्रधान, वेदांत भोयर, युगा भोयर, गौरव बगडते, प्रेम बोंबाटे, प्रतीक धुर्वे, विराज अतकर, देवांश नखाते, प्रज्वल देशपांडे आदीसह बच्चे कंपनीचा सहभाग असतो.




