किशोर साहू, मौदा :- गट ग्रा पं धर्मापूरी अंतर्गत येत असलेल्या सुर संगम ईजनी येथे खाटू शाम बाबांच्या भव्य दिव्य मंदिर बांधकामाचा शीला पूजनाचा मंगल सोहळा महंत श्री छोटे बालकदास महाराज यांच्या शुभहस्ते अतिशय भक्तिमय वातावरणात नुकताच थाटात पार पडला. ![]()
यावेळी कार्यकमाला माजी आमदार टेकचंद सावरकर , जि. प अध्यक्षा निशा सावरकर, भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल, सीए पंकज मुंदडा, भंडारा येथील अभियंता साखरकर , प्रमोद निनावे, लोकेश राखडे, बंटी मिश्रा, डॉ. संजय एकापूरे, प्रदीप ढबाले, अनुप ढोके, नितीन , पं. संतोष व्यास, पो. स्टे. अरोली ठाणेदार स्नेहल राऊत, रमन पटले, सुमीत नन्हेरे, लोकेश मोहतुरे, महेश पटले, भोजराज भिवगडे सह शाम भक्त मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होते.