किशोर साहू : मौदा, ता. ४: सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू असून शनिवार( दि. ३० ऑगस्ट) अरोली/कोदामेंढी जि.पं.सर्कलचा भाजपच्या सर्व पदाधिकारी, गावागावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्यगण सर्व गणेश मंडळाना गणेशोत्सवा निमित्त भेटी दिल्या. सर्वांना सुख, समाधान व समृद्ध ठेवून सर्वांचे विघ्न हरण्याची बाप्पाचरणी मागणी केली.
यावेळी भाजपा तालुका महामंत्री तथा अरोली कोदामेंढी सर्कल प्रमुख भगवान बावनकुळे , माजी महामंत्री नरेश बावनकुळे, सरपंच बोरी घिवारी विशाल सेलोकर, उपसरपंच कोदामेंढी गोपाल गिरमेकर
ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विष्णू देशमुख माजी सरपंच भांडेवाडी दामोधर वगारे,
उपसरपंच धानोली अमित तिल्लीखेडे , सरपंच सिरसोली विनोद कारेमोरे ,
सरपंच तांडा विनोद गभने , माजी उपसरपंच चंद्रशेखर जाधव उपसरपंच वाकेश्वर रामश्री गजभिये, वाकेश्वर भाजपा नेते रंजित ठाकूर ,बूथ प्रमुख मंगेश घिवतोंडे ,संदीप सेंगर शेखर सेंगर, बल्लू सेंगर, स्वरूप गहेरवार तसेच गावागावातील बुथ प्रमुख, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, व नागरिक उपस्थित होते.


