spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कांद्री संताजी नगरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

कन्हान :- कांद्री येथील संताजी नगर परिसरातील युवकांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक ऐक्य, समता आणि प्रबोधनाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थित नयन गायकवाड यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . यावेळी निखिल तांडेकर व ऋषभ बावनकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातुन वंचित, शोषित व कष्टकरी समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. यावेळी उपस्थितांनी “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे”, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणा णुन सोडला. त्यानंतर उपस्थित युवक व नागरिकांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमास ऋषभ बावनकर, नयन गायकवाड, शुभम बावनकर, आयुष संतापे, निखिल तांडेकर, सूर्य संतापे, शाहरुख खान यांच्यासह परिसरातील युवक व नागरि क मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.