spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनुस्मृती चे दहन हे एका जातीसाठी नव्हे तर भारत देशाच्या मुक्ती साठी होते – सुरज ढोणे

नागपूर :- भारत देशात खरी समता बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य देश प्रेम निर्माण झाले ते मनुस्मृती दहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याने मनुस्मृतीचे दहन हे एका जातीसाठी नव्हे तर भारत देशाच्या मुक्तीचे प्रतीक होते. असे प्रतिपादन सुरज ढोणे यांनी केले. ते आज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षास्थानावरू बोलत होते. प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पुष्पहार अर्पण केले. प्रकाश कांबळे यांनी दिपप्रज्वलन केले. याप्रसंगी आंरिमोचे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे यांनी मनुस्मृतीचे दहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले नसते तर खरी समता या देशात नांदली नसती असे विचार मांडले धर्माजी बागडे बोलले मनुवादी विचार सरणीचा विरोधात एक जुट झाल्याशिवाय मार्ग नाही आम्ही तर मनुचे लचके तोडले तो आज आमच्या पासुन कोसो दूर पळाला हे खरे आहे परंतु आमच्यामध्ये आंतरीक मनुने जागा निर्माण केली आहे आता आंतरीक मनुने निर्मुलन करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. जयदेव चिंवडे यांनी प्रास्ताविक केले राजु पांजरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चत्रिरावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार पुण्यशील बोदिले यांनी मानले. कार्यक्रमात प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, गौतम दहिकर, राजु कांबळे, चरणदास गायकवाड, राम वाहणे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles