Related Posts

व्हावा तो सोहळा अनुपम्य

<p><strong>आपल्या देशात काही वर्षांनी वृद्धांची संख्या&comma; जगण्यातली आव्हाने आणखी वाढतील तेव्हा स्वेच्छामरणाचा पर्याय असायला हवा&comma; या मागणीचा रेटाही वाढल्यास नवल नाही…<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मृत्यू हेच माणसाच्या जीवनातील एकमेव सत्य आहे&period; पण तो कधी&comma; कसा आणि कुठे येईल हे माहीत नसणे हे त्यातील सौंदर्य&period; त्यामुळेच जगण्यासाठी अवघ्या जिवाचा आटापिटा करणाऱ्यासमोर तो दत्त म्हणून उभा राहतो आणि त्याची याचना करणाऱ्याला हुलकावण्या देत राहतो&period; त्यामुळे त्याचे काय करायचे हे कोणालाच समजत नाही&period; तसेही मृत्यूचे काय करायचे&comma; हे कोणाच्या हातात असते&quest; मुळात जन्म घेणेच कोणाच्या हातात नसेल तर मृत्यू तरी का असावा&quest; जीवन कोणी तरी दिले असेल&comma; तर मृत्यूही तोच देईल&period; ते संपवण्याचा अधिकार नैतिकदृष्ट्या कोणालाच असू शकत नाही&comma; हा एक मतप्रवाह&period; वेगवेगळ्या धर्मांनीही त्याला दुजोरा दिला आहे&period; तर वादे वादे जायते तत्त्वबोध&colon; करत दुसरा प्रवाह नेमके विरुद्ध सांगून जातो&period; त्याच्या मते&comma; जन्म घेणे कोणाच्या हातात नसले&comma; तरी जगणे हे लोढणे झाले असेल&comma; तर निदान मृत्यू तरी त्या व्यक्तीच्या हातात असावा&period; वेदना सहन करत&comma; कोणावर तरी भार होऊन जगण्यापेक्षा एखाद्याला मृत्यूला आपलेसे करावेसे वाटले&comma; तर त्याला तो हक्क असायला हवा&period; आपल्या जीवनावर फक्त आपलाच अधिकार असेल तर ते कधी संपवायचे तेही आपल्यालाच ठरवता यायला हवे&period;<&sol;p>&NewLine;<p>आपापल्या जागी योग्य असलेले हे दोन्ही मतप्रवाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लुडविग मिनेली यांच्या मृत्यूमुळे&period; ज्या कामासाठी आयुष्य दिले&comma; त्याच कामात मृत्यू येणे हे ज्या थोड्याफार लोकांच्या नशिबात असते&comma; त्यांच्यापैकी मिनेली एक&period; जन्माने स्विस असलेल्या लुडविग मिनेली यांनी व्यावसायिक पत्रकारिता केली&comma; कायद्याचा अभ्यास केला आणि साठीनंतरचे सगळे आयुष्य मनुष्यमात्राला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळावा यासाठी डिग्निटास ही संस्था स्थापन केली&period; ही संस्था ज्यांना स्वेच्छामरण हवे असते&comma; त्यांना त्यासाठी सर्व प्रकारची वैद्याकीय आणि कायदेशीर मदत करते&period; ज्याला स्वेच्छामरण हवे असेल&comma; त्याला ते मिळवून देण्याआधी संस्था त्याला वेगवेगळ्या अत्यंत काटेकोर निकषांखाली पडताळून घेते&period; त्याला गंभीर वा असाध्य आजार असणे&comma; असह्य वेदना होणे&comma; त्याबाबत वैद्याकीय तज्ज्ञांची कागदोपत्री पुष्टी&comma; त्या व्यक्तीची मानसशास्त्रीय पडताळणी हे सारे केले जाते&period; त्यानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाचे ती व्यक्ती स्वत&colon; सेवन करते आणि मृत्यूला सामोरी जाते&period; स्वित्झर्लंडबाहेरील नागरिकही तिथे जाऊन डिग्निटासची सेवा घेऊ शकत असल्यामुळे या प्रकाराला &OpenCurlyQuote;डेथ टुरिझम’ असेही म्हटले जाते&period; स्वेच्छामरण या मुद्द्यासाठी मिनेली यांचा आग्रह इतका टोकाचा होता की प्रसारमाध्यमांत त्यांचा उल्लेख अनेकदा &OpenCurlyQuote;मिस्टर डेथ’ असा केला जाई&period; पण त्यांच्या या प्रयत्नांमुळेच २०११ मध्ये युरोपीय मानवी हक्क न्यायालयाने &OpenCurlyQuote;निर्णयक्षम व्यक्तीला आपल्या आयुष्याचा शेवट कसा व्हावा हे ठरण्याचा अधिकार आहे&comma;’ असा निकाल दिला&period; &OpenCurlyQuote;राइट टु डाय’ या मिनेली यांच्या चळवळीमुळे या मुद्द्याची जगभर चर्चा झाली&period; मुळात मरण्याच्या हक्कालाही दोन बाजू आहेत&period; एक युथनेशिया म्हणजेच दयामरण आणि दुसरे स्वत&colon;च्या इच्छेनुसार मृत्यूचा अधिकार&period; शेवटच्या स्थितीत असलेल्या असहाय रुग्णाची वेदनांपासून सुटका करण्यासाठी त्याचा जाणूनबुजून मृत्यू घडवून आणणे&comma; या प्रकाराला जगभरात कुठेच मान्यता नाही&period; पण दुसऱ्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या इच्छेनुसार डॉक्टर तिला मृत्यूचे साधन उपलब्ध करून देतात आणि ती व्यक्ती स्वत&colon;हून मृत्यूला कवटाळते&period; सहाय्यित मृत्यू किंवा स्वेच्छामरण असेही या प्रकाराला म्हणता येईल&period; मिनेली यांनी नुकतेच म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी स्वत&colon; ठरवून स्वत&colon;चा मृत्यू घडवून आणला&period; त्या अर्थाने&comma; ते केवळ बोलके सुधारक न राहता कर्ते सुधारक ठरले&period; व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य असणाऱ्या समाजांमध्ये मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असू शकतो&comma; याचे मिनेली आणि त्यांचे काम दाखला ठरू शकते&period;<&sol;p>&NewLine;<p>अर्थात त्यांचे हे सगळे काम&comma; जगणे सोपे नव्हतेच&period; ते त्यांची संस्था चालावी म्हणून पैशांसाठी हे काम करतात&comma; त्यासाठी ते लोकांना मृत्यूबद्दल विचार करायला भाग पाडून मृत्यूजवळ नेऊन पोहोचवतात यासह वेगवेगळ्या प्रकारची टीका त्यांच्यावर झाली&period; खटले केले गेले&period; त्यातले अनेक खटले मिनेलींनीच जिंकले ही गोष्ट वेगळी&comma; पण या सगळ्या वातावरणनिर्मितीचा परिणाम असा की त्यांच्या स्वत&colon;च्या स्वित्झर्लंडसह नेदरलँड्स&comma; बेल्जियम&comma; कॅनडा&comma; स्पेन&comma; ऑस्ट्रिया या देशांनीही त्यांच्या नागरिकांना स्वत&colon;च्या मृत्यूचा निर्णय घेण्याची कायदेशीर परवानगी दिली आहे&period; बहुतेक आशियाई देशांमध्ये मात्र अशी परवानगी अद्याप तरी नाही&period; मिनेली यांच्या डिग्निटास या संस्थेच्याच २०२५ मधल्या आकडेवारीनुसार ज्या ज्या देशांमध्ये अशा पद्धतीच्या स्वयंसहाय्यित मृत्यूला कायदेशीर मान्यता आहे&comma; अशा देशांमधील चार हजारहून अधिक लोकांनी या संस्थेच्या सेवा घेत स्वत&colon;चा मृत्यू घडवून आणला आहे&period; दयामरण आणि स्वेच्छामरणाचा विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या &OpenCurlyQuote;द सी इनसाईड’&comma; &OpenCurlyQuote;मिलियन डॉलर बेबी’&comma; &OpenCurlyQuote;अमोर’ यांसारख्या चित्रपटांनी ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे&period; गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून असलेल्या आपल्या पत्नीवर आत्यंतिक प्रेम असलेला पती शेवटी तिला दयामरण देऊन फरार होतो तेव्हा खरे प्रेम आपल्या माणसाला आहे त्या स्थितीत शेवटपर्यंत सांभाळण्यात आहे की त्याची वेदनांपासून सुटका करण्यात&comma; असा प्रश्न उपस्थित करणारा २०१२ मधला &OpenCurlyQuote;अमोर’ हा फ्रेंच चित्रपट खरोखरच प्रेक्षकांच्या हृदयात कळ उठवून गेला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>दयामरण की स्वेच्छामरण यात स्वेच्छामरणाचे पारडे जड असणे&comma; हे अगदीच स्वाभाविक आहे&period; एखादी व्यक्ती कितीही गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून असली तरी तिच्या आयुष्याचा शेवट इतर कुणाच्या हातात असणे हे कधीही नैतिक असू शकत नाही&period; शिवाय एखाद्या नकोशा माणसाच्या बाबतीत दयामरणाचा येनेकेनप्रकारेण फायदाच उठवला जाण्याची शक्यता अधिक&period; त्यामुळे दयामरण हे तूर्त तरी जगभरात सगळीकडेच नाकारले गेले आहे&period; पण जगून झाल्यावर&comma; त्यामधली गंमत संपल्यावर&comma; आता पुरे&comma; असे एखाद्याला वाटू शकते&period; जगणे सुंदर असले तरी त्याचे लोढणे झाल्यावर थांबावेसे वाटले तर तो पर्याय आज तरी आपल्याकडे नाही&period; पण सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या आपल्यासारख्या देशात आणखी काही वर्षांनी वृद्धांची संख्या वाढत जाईल&comma; जगण्यातली आव्हाने आणखी वाढत जातील तेव्हा स्वेच्छामरणाचा पर्याय असायला हवा&comma; या मागणीचा रेटा वाढत गेल्यास नवल नाही&period; आत्ताच दिवसेंदिवस सर्व पातळ्यांवर खालावत चाललेला जगण्याचा स्तर आपण का जगतो आहोत&comma; हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करतो आहे&period; तो आणखी तीव्र होत जाईल तसतसे मिनेली यांनी घालून दिलेली वाट आणखी प्रशस्त होत जाऊ शकते&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतीय परंपरा मृत्यू हा शेवट न मानता जन्ममृत्यूच्या फेऱ्यावर विश्वास ठेवणारी आहे&period; त्यात ज्यालात्याला&comma; ज्याच्यात्याच्या पापपुण्यानुसार जन्ममृत्यूचे फेरे पार करत अखेर मोक्षापर्यंत जाता येते&comma; असे मानले जाते&period; त्यानुसार मागच्या जन्मात केलेली पापे या जन्मात फेडावी लागतात आणि या जन्मी नीट वागाल तर पुढचा जन्म चांगला मिळतो या सुंदर पळवाटेवर मृत्यूच तर सोबतीला असतो&period; सगळे जगणे जगून झाल्यावर तो हवा तेव्हा&comma; हवा तसा मिळवता येणार असेल तर &OpenCurlyQuote;आपुले मरण पाहिले म्या डोळा&comma; जाला तो सोहळा अनुपम्य’ असे तुकोबारायांच्या पाठोपाठ गाता येऊ शकते&period;<&sol;p>&NewLine;