spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मतदान जनजागृतीच्या घोषणांनी दुमदुमले शहर

– कमी प्रतिशत मतदान भागात जनजागृती बाईक रॅलीचा भर

नागपर :- संकल्प करू छान, चुकणार नाही मतदान, मान है, पहचान है, मतदान लोकशाही की शान है, अशा घोषणा देत मनपाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे मतदानाचे कमी प्रतिशत असलेल्या भागांमध्ये बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. मनपाच्या उपायुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे व उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला.

शहरातील मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या भागातील मतदारांमध्ये प्रामुख्याने ही बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, प्रमोद हिवसे आदी उपस्थित होते.

येत्या १५ जानेवारीला नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभाग, अग्निशमन विभाग, एनडीएस विभागासह कर्मचाऱ्यांनी या बाईक रॅलीमध्ये प्रामुख्याने सहभाग घेतला. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातून शुभारंभ होताना या रॅलीत सहभागी झालेल्या फुलांचा वर्षाव करण्यात आला. भारुड च्या चालीवर वाढवू छान लोकशाहीची हे गीत वाजविण्यात येत होते. वाहन चालकांच्या हातात मतदानासाठी जनजागृती करणारे विविध घोषणा असलेले फलक होते.

यातून मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सजग नागरिक व्हा, मतदान करा, नागपूरच्या विकासासाठी ४ मतदान करा, शान है, मान है व पहचान है, मतदान आवश्यक है, अशा घोषणा लिहिलेले फलक दुचाकी चालकांच्या हातात होते. शहरातील मोठ्या चौकात ही थांबून लोकांना मतदारांमध्ये जनजागृती केली.

ही बाईक रॅली छावणी, पागलखाना चौक, काटोल रोड, लॉ कॉलेज, शंकरनगर चौक, मुंजे चौक, घाट रोड, जगनाडे चौक, दोसर चौक, इंदिरा गांधी रुग्णालय व महाविद्यालय, संविधान चौकमार्गे या रॅलीचा समारोप नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात झाली.

या रॅलीमध्ये उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे, अग्निशमन विभागाचे प्रभारी उप अग्निशमन अधिकारी देवानंद शामकुळे, अकलिम शेख, अशोक घवघवे,  शिवाजी शिर्के, दिलीप चव्हाण, दुर्गाप्रसाद चौबे, सुरेश आत्राम, रवींद्र मरसकोल्हे, भगवान वाघे, सामाजिक विकास विभागाच्या नूतन मोरे, दिलीप टेंभूर्णे व आरोग्य विभागाच्या दीपाली नागरे यांनीही या बाईक रॅलीत सहभाग घेतला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.