– आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपद देण्याची चर्चा
मुंबई :- शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या पक्षात जून महिन्यात संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बदलांमध्ये नेतृत्त्वांत बदल होऊन आदित्य ठाकरेंना यांना कार्याध्यक्ष पद मिळणार असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेवर संजय राऊत यांनी अत्यंत सुचक उत्तर दिलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेचं नेतृत्त्व तरुणांच्या हाती जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. संजय राऊत आज पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, माध्यमातील माहिती आणि तुम्ही प्रश्न विचारत आहात त्यावर मी उत्तर देतोय की तरुण पिढीचं स्वागत केलं पाहिजे. तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण तरुणांच्याच हातात जायला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे.”
आदित्य ठाकरेंनी उत्तम काम केलंय
आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरत नाहीत, त्यामुळे इतर कोणाला कार्याध्यक्ष केल्यास ते महाराष्ट्रभर फिरतील तरी असं तुमचेच खासदार खासगीत बोलतात असं पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “खासगीमध्ये बोलण्याला अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेत चर्चा होत असते. मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकीत आदित्य ठाकेरंनी उत्तम काम केलंय. त्यांच्या तरुणांच्या टीमने उत्तम काम केलंय.” संजय राऊतांच्या या विधानामुळे आदित्य ठाकरेंवरील जबाबदारी आता लवकरच वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाणार का?
दिल्लीत विधान परिषदेवर चर्चा का व्हावी असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले, महिला आरक्षणाचा विषय आहे. डिलिमिनेशनचा विषय आहे. या मुळे उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सरकारला इशारा दिला आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. विधान परिषदेवर चर्चा करायला आपल्याकडे बराच वेळ आहे.
महिला आरक्षण विधेयकावर भूमिका काय?
महिला आरक्षण विधेयकावर तुमची भूमिका काय आहे? प्रियंका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर यांनी मिस कॉल दिला. “मिस कॉल हा मिस कॉलच असतो. तुम्ही मिसकॉलचं एवढं काय घेऊन बसलात. महिला आरक्षण विधेयकाबाबत सुरुवातीपासून शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. महिलेच्या राजकीय हिताआड शिवसेना कधी आलेली नाही, येणार नाही. महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे, जिथे महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली.