spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शासनाने रज्जु परिपगार यांचे उपोषण दमनकारी नितीने उधळून लावले

– तात्काळ योग्य निर्णय घ्या -अन्यथा सरकार विरोधात मोठे तीव्र आंदोलन करू -कॉ.राजेंद्र साठे

– 1 मे कामगार दिनी संविधान चौकात रात्रभर आशा वर्कर्स यांनी ठिय्या आंदोलन केले.

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) तर्फे रज्जु परिपगार यांचे सहपरिवार 20 एप्रिल पासून सुरू असलेले आमरण उपोषण शासनाच्या कामगार विरोधी दमनकारी नीतीतून मोठ्या संख्येने पोलीस बळाचा वापर करून उधळून लावले. बारा दिवसापासून सुरू असलेल्या रज्जु परिपगार यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक राजकीय संघटनांकडून समर्थन जाहीर करण्यात येत होते. 45 डिग्री तापमानामध्ये अन्न पाण्याविना राहिल्यामुळे त्यांची शारीरिक स्थिती चिंताजनक होत चालली होती. त्यामुळे सरकारच्या कामगार विरोधी नितीमुळे आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती सुद्धा ढासळत गेली. शासन व प्रशासनावर त्यांचा विश्वास न राहल्यामुळे स्वतःला संपवण्याचा निर्णय एका पोस्टवर द्वारे त्यांनी पाठवला. त्यामुळे आंदोलनाची बाजू समजून न घेता शासनाने दडपशाही नीतीने आंदोलन उधळून लावत त्यांना रुग्णालयात दाखल केले. रज्जु परीपगार यांची बाजू समजून शासनाने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही विविध राजकीय सामाजिक संघटनांना घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कामगार विरोधी नितीचा निषेध करण्याकरता तीव्र आंदोलन करणार. असा इशारा कॉ. राजेंद्र साठे यांनी एका पत्रकातून दिला. रज्जू परिपगार यांच्या सहपरिवार आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्याकरता सिटू च्या आशा वर्कर मोठ्या संख्येने कामगार दिनी रात्रभर ठिय्या आंदोलनात उपस्थित होत्या. सप्टेंबर 2025 पासुन थकीत मानधन द्या, सन्मा. उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 च्या अंतिम आदेशानुसार कार्यादेश मिळण्याबाबत, ऑगस्ट 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंतचे PMMVY Online Portal लाभार्थी नोंदणी करण्याचा आशा स्वयंसेविकांच्या कामाचा मोबदला द्या, सप्टेंबर 2025 पासून केंद्राचे थकीत आशा व गटप्रवर्तक यांचे केंद्राचे थकीत मानधन व इतर कामाचा मोबदला द्या. वरील मागण्याकरता 20 एप्रिल पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या जिल्हा समन्वयक रज्जु परीपगार सहपरिवार जिल्हा परिषद पासून सहपरिवार आमरण उपोषण करीत होत्या. शासन व प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असून रज्जु परीपगार यांची आमरण उपोषणाच्या 12 व्या दिवशी अन्न व पाण्याविना शारीरिक स्थिती दयनीय होत चाललेली होती. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळत चाललेले होते. शासनाने सन्माननीय उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 अंतिम आदेशानुसार कार्यादेश काढावा. सध्या आंदोलन काही कालावधी करतात थांबवण्यात येत असून शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास परत एकदा यापेक्षा तीव्र आंदोलन करणार अशी भूमिका एका पत्रकातून कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी जाहीर केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.