spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरकार ने मोर्शी मतदार संघातील ४ लाख जनतेला दिले धनोडीचे कंद – माजी आमदार देवेंद्र भुयार 

अर्थसंकल्पामध्ये वरुड मोर्शी तालुक्यातील प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धारा साठी शून्य निधी, रुग्णालय बांधकाम करणे साठी शून्य निधी, पर्यटन विकास करण्यासाठी शून्य निधी,ग्रामीण भागातील पांदण रस्त्याचे डांबरी करणं करण्यासाठी शून्य निधी, ग्रामीण भागातील पूल बांधकाम करणे साठी शून्य निधी, शिक्षणाचा दर्जावाढ करणेसाठी शून्य निधी,नवीन बंधारे व सिंचन प्रकल्पासाठी शून्य निधी,दलित बांधवांच्या विहार व इतर विकास कामासाठी शून्य निधी,आदिवासी बांधवांच्या भागातील विकास कामांसाठी शून्य निधी,मी मंजूर केलेल्या २८ गावातील पुनर्वसन च्या कामासाठी शून्य निधी,राजुरा बाजार ग्रामीण रुग्णालय रद्द केले, बेनोडा ट्रामा केयर रद्द केले,मोर्शी ट्रामा केयर रद्द केले, वरुड अतिरिक्त ५० बेड रुग्णालय रद्द केलेले आहे त्या रुग्णालयाला कुठेही परत मान्यता झालेली दिसत नाही, मागील पंचवार्षिक मध्ये मी मंजूर केलेल्याचं कामावर डबल-डबल २० कोटी रुपये मंजूर करून ठेकेदाराने भले करण्याचा आमदार यांचा संकल्प, १९ महिन्यात,५ अधिवेशनात शून्य निधी आणण्याची परंपरा माझा आमदार महोदयांनी कायम ठेवली आहे त्याचे आभारच परंतु वरुड मोर्शी तालुक्यातील ४ लक्ष जनतेच्या हातावर धनोडी चे कंद दिल्याबद्दल आश्चर्यच आहे.

– माजी आमदार देवेंद्र भुयार

Popular Articles