spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डायल ११२ कॉलची तात्काळ दखल घेऊन मौदा पोलिसांनी इसमाचा जीव वाचवला.

 

मौदा 1 : दिनांक ३० जून २०२५ रोजी मौदा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शुभम ईश्वरकर आणि चालक पोलीस अंमलदार ललितकुमार ठाकूर हे डायल ११२ ड्युटीवर असताना, एक कॉल प्राप्त झाला की एक इसम  पंकज राजेंद्र खोब्रागडे, भंडारा रोडवरील माथणी पुलाजवळ आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सदर माहिती मिळताच ड्युटीवर असलेले दिवस पाळी अधिकारी पोहवा देवेंद्र भुरे आणि पोलीस अंमलदार अतुल निंबार्ते यांनी ही माहिती तात्काळ मौदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक  सारिन दुर्गे यांना दिली. त्यानुसार दिवस पाळीतील अधिकारी, डायल ११२ पथक आणि इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

माथणी विसर्जन घाटाजवळ पोहोचून पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान पुलाखालील नदीच्या पात्रात मोठा आवाज झाल्याचे ऐकू आले आणि त्यानंतर पंकज खोब्रागडे यांनी वाहत्या प्रवाहात उडी घेतली. प्रसंगावधान राखून पोलिसांनी जीव धोक्यात घालून पाण्यात उडी मारून पंकज याला सुखरूप बाहेर काढले.

पोलिसांनी ओळख पटवून खात्री केली की सदर इसम पंकज राजेंद्र खोब्रागडेच आहे. याबाबत पंकज याची बेपत्ता असल्याची नोंद वाडी पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे झाली होती. आत्महत्येपूर्वी पंकजने आपल्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. त्यामुळेच नातेवाईकांनी डायल ११२ वर संपर्क साधून मौदा पोलिसांना माहिती कळवली होती.

पंकज याचे वडील, राजेंद्र खोब्रागडे जे स्वतः वाडी पोलीस स्टेशन, नागपूर येथे पोलीस अंमलदार आहेत  ते मौदा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी पंकज याला त्याच्या वडीलांच्या ताब्यात सुपूर्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.