नागपूर :- समाजाच्या उत्कर्षासाठी जिजाऊ साऊंच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन ५ व्या, राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका व कवयित्री नागपूरच्या कन्या आरती झोटिंग यांनी व्यक्त केले, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने या संमेलनाचे आयोजन पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये केले होते, संमेलनातील त्यांच्या ओजस्वी भाषणाने संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. महिलांच्या संवेदनशील विचारांचा आणि साहित्यातील क्रांतीचा वेध घेत त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. आपल्या अध्यक्षीय भाषणात आरती झोटिंग यांनी मांडलेले प्रमुख विचार: विद्रोही स्त्रीमनाची अभिव्यक्ती: महिलांचे साहित्य आता केवळ चार भिंतींच्या चौकटीत बंदिस्त नसून, ते समाजचिंतन आणि सामाजिक विद्रोहाचे सशक्त साधन बनले आहे.
बदलती स्त्री-प्रतिमा: आजची लेखिका स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहे. तिचे लेखन केवळ भावनाप्रधान नसून व्यवस्थेला रोखठोक प्रश्न विचारणारे आहे. वाचनसंस्कृती आणि सामाजिक बदल: नवीन पिढीतील महिलांनी लेखन आणि वाचनाची ही समृद्ध परंपरा पुढे नेऊन साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे हत्यार बनवावे. आरती झोटिंग यांच्या या परखड आणि प्रेरणादायी भाषणाने संमेलनात एक नवी वैचारिक ऊर्जा निर्माण केली. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या गजरात त्यांच्या विचारांचे स्वागत केले. बाळासाहेब देशमुख व राजेंद्र फंड यांना मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, ज्येष्ठ कवी, ज्ञानेश्वर धायरीकर यांच्या माझे काव्य विश्व या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले, ज्येष्ठ कवी नाना माळी व युवा कवयित्री साक्षी जमादार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनांची दोन सत्र संपन्न झाली यामध्ये राज्यातील मोठ्या संख्येने कवींनाी आपला सहभाग नोंदवला होता, सुर्यकांत नामगुडे, किशोर टिळेकर, साक्षी जमादार, सुवर्णा वाघमारे,वर्षा मुस्केवाड यांच्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली,या प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, स्वागताध्यक्ष शर्मिला गायकवाड, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, पुणे विभागीय अध्यक्ष सुर्यकांत नामुगडे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर टिळेकर, प्रदेश संघटक सचिव अमोल कुंभार, प्रदेश सरचिटणीस विक्रम शिंदे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, सुवर्णा वाघमारे, संगीता लंघे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश रेडेकर, प्रा.सुरेश वाळेकर, पुणे शहर सचिव बाळकृष्ण अमृतकर,संघटक सचिव योगेश चौधरी व आदींची उपस्थिती होती.








