spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑक्टोबर क्रांती आजही प्रासंगिक व प्रेरणादायी – अरूण लाटकर

नागपूर :- जगातील पहिली समाजवादी महान रशियन ऑक्टोबर क्रांती आजही प्रेरणादायी व प्रासंगिक असल्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अरूण लाटकर यांनी पक्ष कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात मांडले. 7 नोव्हेंबर 1917 ला तत्कालीन सोवियत यूनियनमधे कॉ. लेनिन यांचे नेतृत्वात कामगार वर्गाच्या नेतृत्वात समाजवादी क्रांती यशस्वी झाली होती. 72 वर्षानंतर या व्यवस्थेचे विघटन झाले या घटनेला देखिल आज 35 वर्षे झाली आहेत. याप्रसंगी लाटकर पुढे म्हणाले की, त्यानंतर अनेक जागतिक व भारतीय लेखकांनी याबाबत भाष्य करतांना म्हटले आहे की, जरी आज समाजवाद कमजोर झालेला दिसत असला तरी जगातील काही भागात सतत या ना त्या रूपात समाजवादी विचार पुढे येत राहतील. न्यूयॉर्कमधील महापौरपदाच्या निवडणूकीत जोहरान ममदानी यांचा ज्या निवडणूक जाहिरनाम्यावर विजय झाला तो समाजवादी स्वरूपाचाच आहे. मागील कालावधीत श्रीलंका व लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांमधे डाव्या उमेदवारांचा विजय, नुकत्याच आयर्लंडमधील निवडणूकीत डावा उमेदवार निवडून येणे वा फ्रान्समधील निवडणूकीत उजव्यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यात डाव्यांची भूमिका यातून या आकलनाचा प्रत्यय येतो. ते म्हणाले की, मानवापासून मानवाची मुक्तता कशी करता येवू शकते, महिलांच्या श्रमाचे मोल कसे दिले जावू शकते, कामगार व शेतक-यांना न्याय कसा दिला जावू शकतो, माणसाच्या कौश्यल्याचा योग्य वापर केल्याने मागास देश सुध्दा कशी उच्च वैज्ञानिक प्रगती साध्य करू शकतो याचा वस्तुपाठ रशियन क्रांतीने घालून दिला. हिटलरच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट शक्तींचा पराभव करून जगाला एका भयंकर संकटातून वाचवण्याचे महान कार्य व त्यानंतर जगातील अनेक देशांना साम्राज्यवादी जोखडातून मुक्त करण्यासाठी तेथिल स्वातंत्र चळवळींना मदत करण्याचे कार्यदेखिल सोवियत यूनियनने केले होते. या क्रांतीमुळे जगातील साम्राज्यवादी देशांना अनेक वर्षे जनकल्याणकारी योजना राबवाव्या लागल्या होत्या. आज भांडवली अर्थव्यवस्था संकटात सापडल्याने त्यांनी सामान्य जनतेच्या शोषणाचा जो मार्ग अवलंबला आहे, त्यापासून मुक्ततेसाठी जनता समाजवादी मागण्यांचा पर्याय निवडत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात, ऑक्टोबर क्रांती आजही यादिशेने प्रेरणा देत राहील.

कार्यक्रमाची अध्यक्षता पक्षाचे जेष्ठ सभासद कॉ. विश्वनाथ आसई यांनी केली तर समारोप पक्षाचे जेष्ठ सभासद कॉ. मदन भगत यांनी केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.