Home Latest News मेडिकल कॅज्युल्टी च्या प्रवेशद्वाराची दुर्दशा

मेडिकल कॅज्युल्टी च्या प्रवेशद्वाराची दुर्दशा

0
64
नागपुर ११: नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे भारतातील अति महत्त्वाचे व मोठे समजल्या जाते. येथे सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेशंट येत असतात. ज्यांच्याकडे पैसे नसतात ते व ज्यांच्याकडचे खाजगी दवाखान्यात पैसे संपले त्यांना येथे रेफर केल्या जाते. दररोज येथे शेकडो रोगी भर्ती केल्या जातात. दूर दूरुन ॲम्बुलन्स ने येणारे पेशंट याच आकस्मिक प्रवेश द्वाराने विभागात येतात. तेव्हा ॲम्बुलन्स दारापर्यंत न्यायला अक्षरशः सर्कस करावी लागते. कारण येथील टाइल्स तुटलेल्या अवस्थेत आहेत.
शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) मध्ये विविध ठिकाणी अनेक बांधकामे सुरू आहेत. परंतु मागील अनेक वर्षापासून अशा स्थितीत असलेले आकस्मिक प्रथमोपचार केंद्राचे पोर्च मात्र स्ट्रेचर, ऑटो, ॲम्बुलन्स नेण्यासाठी अत्यंत गैरसोईचे आहे. ह्या कॅज्युल्टी च्या प्रवेश द्वारावरील मार्ग विना विलंब दुरुस्त करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात धार्मिक सजावट केलेले मंदिर, पेंडाल दिसून आले. निवासी डॉक्टरांनी मार्ड (MARD) या संघटनेच्या माध्यमातून नवीन वस्तीगृहाच्या प्रवेशद्वारावरच एक भव्य मंदिर उभे करून त्यात गणेशजी विराजमान केले. अनेक वस्तीगृहात. हा परिसर शांतता झोन असला तरी येथे कुणाच्या परवानगीने हे सुरू आहे हे कळायला मार्ग नाही. दुसरीकडे वैज्ञानिक शिक्षण घेणारे डॉक्टर धार्मिक्तेकडे का व कशासाठी वळत आहेत हेही कळायला मार्ग नाही. हा प्रकार अधिक वाढला तर डॉक्टर स्वतःवर विश्वास ठेवण्याऐवजी भगवानावर विश्वास ठेवेल व हे मानवाला न परवडणारे ठरेल. अशी शंका याप्रसंगी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केली.