spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदिशक्ती दुर्गा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

– भव्य कलश यात्रा, कावड यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रमांनी शिवनगर परिसर दुमदुमले. 

कन्हान :- शहरातील शिवनगर गल्ली नं. ५ येथील आदिशक्ती दुर्गा माता मंदिरात आदिशक्ती दुर्गा माता यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले. रविवार (दि.२३) ते बुधवार (दि.२६) ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

सोहळ्याच्या प्रारंभी रविवार (दि.२३) ऑगस्ट ला भव्य कलश यात्रा सकाळी ११ वाजता बी.के.सी. पी. शाळेजवळील हनुमान मंदिर घाट येथुन काढुन महामार्गाने यात्रा गांधी चौक, आंबेडकर चौक, तारसा चौक या सह विविध मार्गाने नगरभ्रमण करत ही यात्रा शिवनगर येथील आदिशक्ती दुर्गा माता मंदिर परिसरात पोहोचली. महिलांनी डोक्यावर कलश धारण करून मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. ‘जय माता दी’, ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने तसेच ढोल-ताशांच्या गजराने संपुर्ण शिवनगर परिसर भक्तिमय झाले होते. कलश यात्रे दरम्यान आकर्षक सजावट, धार्मिक घोष, ढोल-ताशे व भक्तांच्या उत्साहामुळे परिसराला जणु यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

लहानांपासुन ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गणेश पूजन, देवी-देवतांचे आवाहन, जलाधिवास, अताधिवास,पुष्पाधिवास, मिष्ठान्नाधिवास, फलाधिवास, वस्त्राधिवा सधान्याधिवास, पूजन व हवन अशा विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले. मंत्रोच्चार, वेदमंत्रां चा निनाद आणि भक्तांच्या जयघोषामुळे मंदिर परिसरात दिवसभर आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. तसेच श्रावण महिन्याच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन कावड यात्रा व शिवजलाभिषेकासह विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवभक्तांनी पवित्र जल आणुन भगवान शिवाचा जलाभिषेक केला. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आलेल्या धार्मिक यात्रांमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले.

बुधवार (दि.२६) ऑगस्ट रोजी देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा व स्थापना, हवन आणि कन्या भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर सायंकाळी ७ वाजता पासुन मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. धार्मिक सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली. चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे शिवनगर परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. माता दुर्गेच्या जयघोषाने आणि धार्मिक मंत्रोच्चारांनी संपुर्ण परिसर दुमदुमून गेला. आदिशक्ती दुर्गा माता मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि सामुहिक सह भागाचा सुंदर संगम ठरला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत माता दुर्गेचे दर्शन व आशीर्वाद घेतला. या सोहळ्याने परिसरातील भाविकांना आध्यात्मिक समाधान व भक्तीमय आनंद लुटता आला.

Popular Articles