spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिलांमुळेच घराची व समाजाची प्रगती – इंजि. आनंद चंद्रिकापुरे

गोरेगाव :- कुटुंबाच्या घडणीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महिलांमुळेच घराची आणि समाजाची खरी प्रगती घडते, असे प्रतिपादन इंजि. आनंद चंद्रिकापुरे, सचिव भारतीय जनता पक्ष गोरेगाव यांनी केले.

ते एका ग्रामपंचायत तेढा च्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी भंडारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय जितेंद्र मेंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती वालदे,माजी उपसरपंच डॉ.विवेक मेंढे, माजी सरपंच डीलेश्वरी औरासे, माजी सरपंच रत्नमाला भेंडारकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी सांगितले की, महिला ही कुटुंबाची आधारस्तंभ असते. तिच्या कष्ट, त्याग आणि संस्कारामुळे कुटुंब मजबूत होते. महिलांना योग्य शिक्षण, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात. आज महिला शिक्षण, उद्योग, प्रशासन, क्रीडा तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही आपली ठळक छाप उमटवत आहेत, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. महिलांच्या सक्षमीकरणामुळेच समाजाची प्रगती वेगाने होऊ शकते. महिलांचा सन्मान आणि त्यांचे अधिकार जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Popular Articles