spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वर्ष २००० बॅचचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

– २५ वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा; शिक्षकांचा भावनिक सत्कार

कन्हान :- स्थानिक बाळीराम दाखणे हायस्कूल (विकास) येथील २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २५ वर्षां नंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत अविस्मरणीय क्षण अनुभवले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्य क्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित शिक्षकांना व्यासपीठावर आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भाव पूर्ण सत्कार करण्यात आला.

यामध्ये माजी मुख्याध्यापक  मंडपे, खर्चे, माजी उपमुख्याध्यापक एकनाथ खर्चे, एन एस मालविय, नारनवरे, चंद्रकुमार चौकसे , ज्ञानप्रकाश यादव, किशोर संघई ,  ठमके, चौकसे, गजभिये, फरसोले , सायरे यांचा समावेश होता. तसेच विद्यमान मुख्याध्यापक सचिन अल्लेड वार, पर्यवेक्षक पशिने, शारिरिक शिक्षक माधव काठेके, शिक्षक अमित थटरे, विलास उईके, कामडी आणि भुरे, शाम मेंढे, भोंगाडे, श्रीम ती घोडमारे , भरडे यांचा विद्यार्थ्यां च्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत सध्याच्या नोकरी, व्यवसाय व आयुष्यातील प्रवास सांगितला. “शाळेने दिलेल्या शिक्षणामुळेच आम्ही विविध क्षेत्रात यशस्वी झालो,” अशा भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले. मनोरंजनात्मक खेळ, सुगम संगीत, वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक साहित्य भेट म्हणुन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. स्नेह भोजनाचा आस्वाद घेताना अनेक विद्यार्थी भावुक झाले. २५ वर्षांनंतर भेट झाल्याने निरोप घेताना अने कांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन लुहुरे यांनी तर आभार किशोर धोटे यांनी मानले. सुमारे ८० माजी विद्यार्थी कुटुंबासह उपस्थित होते.

“हा सोहळा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला असुन पुढील वर्षी याहुन भव्य कार्यक्रम घेऊ,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.