कन्हान :- श्री हनुमान मंदीर टेकाडी येथुन श्री हनुमान मंदीर जामसावळी श्री हनुमान पायदळ पालखी यात्रा टेकाडी मंदीरात पुजा अर्चना करून गाव भ्रमण करित नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी बस स्टाप, कांद्री, कन्हान ते कामठी मार्गाने जल्लोषात जय हनुमान च्या गर्जेनेत जागोजागी भाविक भक्तानी फुलांचा वर्षाव, चाय, पाणी, अल्पोहाराने जंगी स्वागत करून पालखी यात्रा प्रस्थान करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे गुरूवार (दि.२६) फेब्रुवारी २०२६ ला सकाळी ९ वाजता श्री हनुमान मंदीर टेकाडी येथे श्री हनुमान पायदळ पालखी यात्रेची गावातील जेष्ठ नागरिक व श्री हनुमान मंदीर कमेटी अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे यांच्या हस्ते पुजा, अर्चना, महाआरती व प्रसाद वितरण करून पुरूष, महिला भजन मंडळानी श्री हनुमानाचे भजन गात टेकाडी गावचे नगर भ्रमण करून “जय हनुमान च्या जय घोष करित नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी बस स्टाप, कांद्री, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सामोर जल्लोषात जय हनुमान च्या गर्जेनेत भाविक भक्तानी फुलांचा वर्षाव, चाय, पाणी, अल्पोहार वितरण करित जागोजागी जंगी स्वागत करून पालखी यात्रा कन्हान ते कामठी मार्गाने श्री हनुमान मंदीर जामसावळी कडे प्रस्थान करण्यात आली.

यावर्षी श्री हनुमान पालखी यात्रेत नत्थु मोहाडे, गोपिचंद गुरधे, मनोज गुरधे, वीपन गुरधे, बालकिसन गुप्ता, पंकज राऊत, चंद्रकांत कुरडकर, मंगेश हुड, तुषार निमकर, रविंद्र मोरे, प्रज्वल हुड, गजानन बोरघरे , कुणाल लक्षणे, मनिष कांबळे, प्रविण लेकुरवाळे, आयुष पारधी, योगराज उमप, संतोष गाडगे, मंगेश बंड , सुशांत डेंगे, विमल हुड, प्रफुल गाडबैल, प्रविण सावर कर, मनोहर सातपैसे, विनोद खोरे, प्रशांत खोरे, सुरेश खोरे, ओम कडु, आत्मसमर्पन माऊली भाजन मंडळ – निर्मला गुडेराव हुड, बेबी धनिराम राऊत, मैना मधुकर राउत, पार्वती नामदेव भलावी, उर्मिला चैनलाल कोल ते, कमल शंकरराव धोटे, विमल वसंतराव हुड, शकुंत ला वामन गाडगे, मंदा गि-हे, निर्मला मिरे, मिरा धनिरा म राऊत, चंद्रकला वसंता आमले, सारिका सुनिल राऊत, सहेली महिला भजन मंडळ अंजु उमाळे, माधुरी उमाळे, हिरा दळणे, नानु भोयर, कल्पना राऊत, त्रिवेणी इंगळे, कल्पना हुड, अनिता राऊत, रंजना हुड, सिमा उमाळे, वंदना गाडगे, सरिता कश्यप, सुनिता राऊत सह मोठया प्रमाणात भाविक भक्त मंडळी सहभागी असुन शुक्रवार (दि.२७) फेब्रुवारी ला सायंकाळी सावनेर- केळवद मार्गे तायगाव खैरी मॉ शारदा मंगल कार्यालयात सुनिल भाऊ पिंजारे यांचे कडुन भोजन आणि रात्री मुक्काम. शनिवार (दि.२८) फेब्रुवारी ला सकाळी श्री हनुमान मंदीर जामसावळी ला पोहचुन तिथे पुजा अर्चना, भजन, किर्तन व दही काला करून महाप्रसाद ग्रहण करून सायंकाळी टेकाडी करिता प्रस्थान होईल.




