spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नरेंद्र नगर उड्डाणपुलाखाली मुलांसाठी विविध खेळणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा नरेंद्र नगर उड्डाण पुलाखाली सौंदर्यीकरण करण्यात आले असून, त्याठिकाणी मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी(ता.२७) या कामाची पाहणी करीत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. याप्रसंगी नगरसेविका विशाखा मोहोड, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे आणि क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेद्वारा नरेंद्र नगर उड्डाण पुलाखाली पिकल बॉल, बॅडमिंटन, पेडल, स्केटिंग रिंग बॉक्स क्रिकेट, आणि मल्टी स्पोर्ट्ससाठीची सोय करण्यात येत आहे. आयुक्त यांनी सर्वप्रथम संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी पूलखाली लोखंडी कठडे लावून उपरोक्त क्रीडासाठी त्वरित मैदान तयार करावे आहे. तसेच संबंधित विभागाला कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी मुलांसाठी सिंथेटिक टर्फ देखील लावण्याचे निर्देश दिले. याशिवाय त्यांनी कामाची संथ प्रगती वर नाराजी व्यक्त केली. तसेच येथे मुलांसोबत येणाऱ्या पालकांसाठी पार्किंग सुविधा करण्याचे निर्देशित केले. याप्रसंगी धंतोली झोन चे सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, आणि उप अभियंता राजेंद्र जिवतोडे उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.