किशोर साहू, मौदा :- नवयुवक सांस्कृतिक मंडई महोत्सव मंडळ राजोली तर्फे आज रविवार (ता. १५ नोव्हेंबर) सायं.७ वाजता पासून दोन दिवसीय मंडईची सुरुवात बाजार चौक राजोली येथे वाशिम येथील निंबाजी तागड महाराज यांच्या भारुड चा कार्यक्रम झाली असून, सोमवार (ता.१६ नोव्हेंबर)ला सकाळी १० वाजता पासून ते सायंकाळपर्यंत शाहीर पुरुषोत्तम खांडेकर विरुद्ध शाहीर राजहंस देवगडे यांच्या दुय्यम खडा तमाशा, तर रात्री ९ वाजता कोल्हापूरच्या झिंगाट या मराठमोळी लावण्याच्या कार्यक्रमाने समारोप होणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गावातील, परिसरातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक सांस्कृतिक मंडई महोत्सव मंडळाचे अध्यक्ष रवी वानखेडे, उपाध्यक्ष रवी पोटभरे ,सचिव चेतन आंबिलढुके, सहसचिव वैभव श्रावणकर, कोषाध्यक्ष अजय श्रावणकर, सह समस्त सदस्य गण परिश्रम घेत असून सर्व ग्रामवासी सहकार्य करत आहेत. या मंडई महोत्सवाचा लाभ घेण्याचे आव्हान ग्रामपंचायत राजोली सरपंच योगेश महादुले सह समस्त सदस्यगणांनी केले आहे.






