spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगररचना विभागाने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे – महापौर निता ठाकरे यांचे निर्देश

नागपूर :- शहराच्या विकासाठी मनपाचे उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता असून, नगररचना विभागाने या संदर्भात पावले उचलावी, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी आज (ता. 12) दिले.

महापौर निता ठाकरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात मनपाच्या उत्पन्न वाढीच्या संदर्भात नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे, उपायुक्त निर्भय जैन, नगररचना विभागाचे उपसंचालक गिरीश गोडबोले, , नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ऋतुराज जाधव उपस्थित होते.

नगररचना विभागाचे उपसंचालक गिरीश गोडबोले यांनी गेल्या चार वर्षात नगररचना विभागातर्फे मनपाला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या आर्थिक वर्षात डिसेंबर 2025 पर्यंत नगररचना विभागातर्फे मनपाला 252 कोटी रुपयांचे उत्पन्न झाल्याची माहिती दिली. या रक्कमेत निश्चितपणे वाढ होईल, असेही गोडबोले यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याची आवश्यकता असून यात नगररचना विभागाची मोठी भूमिका असल्याचे महापौर ठाकरे यांनी सांगितले. मनपाला मिळालेल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याची आवश्यकता असल्यास तशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्या, असे निर्देशही महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिले. यावेळी सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी इमारतींचा पुनर्विकास करताना अनेकदा बहुमजली इमारती उभारल्या जातात. परंतु, सिवर लाईनची क्षमता मात्र वाढविली जात नाही. यामुळे एका इमारतीमुळे या परिसरातील इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात नगररचना विभागाने विकासकाला आवश्यक मंजुरी देताना विकासकाने सिव्हर लाईन व इतर नागरी सुविधांची क्षमता वाढविण्यावर निर्बंध घालावे, अशी सूचना बोरकर यांनी केली. त्याचप्रमाणे नगररचना विभागाचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन या विभागातील मनुष्यबळाची गरज भागवावी, अशी सूचना त्यांनी यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीच्या संदर्भात चर्चा करण्यात येईल. या विभागाचा मनुष्यबळाचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.