spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान ला शितला मातेचे पुजन करून गाव पुजा संपन्न.

 
कन्हान ०३ : – वरूण राजाला प्रसन्न करण्याकरिता तसेच आपल्या गावात आणि परिसरात पाऊस चांगला पडुन शेती चांगली पिकुन धन, धान भरपुर होऊन सर्व लोक सुखी होण्याची प्रार्थना करित कन्हान येथे हनुमान मंदीर, शितला माता मंदीरात मातेचे पुजन करून गाव पुजा संपन्न झाली.
मंगळवार (दि.१) जुलै २०२५ ला दुपारी १ वाजता विवेकानंद नगर कन्हान येथील प्रदीप सेवक जी हुड यांचे घरून महिलांनी गाव पुजा शितला माता पुजनाची तयारी करून विवेकानंद नगर येथील श्री हनुमान मंदीरात पुजा अर्चना करून पुढे होमपाईप कंपनी येथील शितला माता मंदीरात पुजा, अर्चना व भजनाचा कार्यक्रम करित आपल्या गावात आणि परिसरात पाऊस चांगला पडुन शेती चांगली पिकुन धन, धान भरपुर पिकुन सर्व लोक सुखी होण्याची प्रार्थना करून उपस्थित सर्वाना प्रसाद वितरण करून गाव पुजा थाटात संपन्न करण्यात आली. या गाव पुजा कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सौ वनिता कावळे, कुसुम मेहरकुळे, रजना भोयर, उषा बंड, विणा हुड, शारदा शिवरकर, शकुन पाहुणे, कविता इंगळुकर, उमा पाहुणे, वनिता चकोले, अरुणा ठाकरे, बावन‌कर ताई, चचाणे, शिला बावणे, लला उन्हाळे, जया घोटेकर, रेखा संतापे, साकोरे काकु, याद‌व मँडम, चिखले ताई, गिरी ताई आदीनी प्रामुख्याने उपस्थित राहुन सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.