नागपूर 28 : राजेशाहीचा गर्दित लोकशाहिला थारा नव्हतीच परंतु या देशाचा पटलावर माणूसकीचा पाझरा फोडून समता मुलक समाजाची शिकवण देवून परिवर्तनाची वाट सरळ करून राजा कशा असावा हि छाप सोडून गेलेले प्रखर लोकशाही चे पुरस्कर्ते राजे छत्रपती शाहू महाराज हे होते असे प्रतिपादन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विचार मंच चे अध्यक्ष सुधाकराव टवळे यांनी केले ते आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चळवळीचे खंदे कार्यकर्ते राजु कांबळे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून नामदेवराव निकोसे, जयदेव चिंवडे, सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपुरी राजु दादा पांजरे हे होते नामदेवराव निकोसे यांनी महाराजांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकताना कथन केले शाहू महाराजांचे पाणी जिरवा पाणी अडवा हे धोरण ऐतिहासिक ठेवा आहे राधाबाई धरण बांधताना त्यांच्या रजयेत वेठबिगारी ची कांमे करणारे महार,चमार भंगी ढोर यांना धरणाचे बांधकाम करण्यासाठी प्राधान्य देवून त्यांच्या वर जे उपकार केले ते विसरतात येत नाही असे भाष्य केले. सुखदेव राव मेश्राम यांनी छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले तर आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रा.रमेश दुपारे यांनी केले कार्यक्रमात पुण्यशील बोदिले यांची शहर महासचिव पदावर नियुक्ती झाली म्हणून त्यांचा राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी आनंदराव गोरे, मनोहर इंगोले, शालिक बांगर, अभिषेक मिश्रा, राहूल त्रिवेदी,व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.







