– महोत्सवात मोठा जन-सागर एकत्र, महारैलीने तोडले गर्दीचे सर्व रेकॉर्ड
कन्हान :- भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि भारतीय संविधानाचा ७५ वे गौरवशाली वर्ष पूर्ण यांचे औचित्य साधुन ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती कन्हान-कांद्री’ द्वारे “जयघोष विचारांचा, महोत्सव आत्मसन्मानाचा, संदेश समतेचा” या भव्य भारतीय संविधान थीम च्या अंतर्गत तीन दिवसीय भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या संस्थेच्या विद्यमाने आयोजित या महोत्सवाने यशस्वि तेचे नविन कीर्तिमान स्थापित करित कन्हानच्या इति हासात पहिल्यांदा महारैलीत शहराच्या महामार्गावर मोठा जनसागर एकत्र येऊन ” युध्द नको, बुध्द हवा”, ” जय भीम ” च्या जय घोषाने कन्हान शहर निनांदले होते. ![]()
पहिल्या दिवसी प्रबोधन आणि जय भीम सलामी
सोमवार (दि.१३) एप्रिल ला सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे ‘जयभीम वाल्याची शान’ प्रबोधनात्मक डान्स-ड्रामा कार्यक्रम प्रियदर्शन सोनटक्के व संच नागपुर यांच्या सादरीकरणातुन उत्साहात पार पडला. रात्री १२ वाजता महाररेजिमेंट आणि समता सैनिक दल व्दारे भव्य ‘जयभीम सलामी’ देऊन केक कापुन फटा क्यांची आतिषबाजी करण्यात आली.
दुस-या दिवसी बुद्ध वंदना, संविधान जागर आणि भव्य भोजन
मंगळवार (दि.१४) एप्रिल ला सकाळी ९ वाज ता बुध्द विहार सिध्दार्थ कॉलोनी, गणेश नगर कन्हान येथे महापुरुषांना मानवंदना अर्पण करुन संविधान जनजागृती कार्यक्रम स्वप्निल फुसे व संच नागपुर यांच्या वतीने पार पडला. बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी तर्फे सिद्धार्थ कॉलनी गणेश नगर येथील बुद्ध विहारात सकाळी ११.३० वाजता डॉ. पूजा रामटेके व डॉ.सुमेध रामटेके यांच्या मार्गदर्शनात त्वचा व हृदयविकार तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेत विविध आरोग्याची तपासणी करण्यात आली. सायंकाळी भोजनदान कार्यक्रम संपन्न झाला. ![]()
तिस-या दिवसी आरोग्य तपासणी शिबीर आणि महारैली
बुधवार (दि.१५) एप्रिल ला सकाळी ११ वाजता बुद्ध विहार, सिद्धार्थ कॉलनी येथे डॉ. नागेश पाटील यांचे व्दारे होमिओपॅथी वैद्यकीय तपासणी शिबिराचे अनेक नागरिकांनी होमि ओपॅथीची तपासणी करुन घेतली. सायंकाळी पंचशील नगर सत्रापुर येथुन नाका नंबर सात आंबेडकर नगर पर्यंत महारॅलीत तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना वरील विविध संदेश देणा-या दुष्याचे चित्र रथ, यात कोहिणुर हि-यात डॉ. बाबासाहेबाची प्रतिमा विशेष आकर्षण होती. आखाडा, डी जे, विधृत रोषणाई सह भव्य महारैली काढण्यात आली. महारैलीत युवकांनी ‘कोट-ब्लेजर’ परिधान करून सहभागी होऊन स्वाभि मान आणि प्रगतीचा संदेश देत होते. ‘संत गाडगेबाबा’ च्या वेशभुषेत एक अनुयायी रैली सामोर सतत झाडुने महामार्ग स्वच्छ करित स्वच्छता विषयी जनजागृती ही करित होता. या ऐतिहासिक महारैलीमध्ये सर्व धर्मांचे आणि समुदायाचे लोक एकत्र येत. महारैली मार्गावर विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना आणि राजकीय पक्षा व्दारे शरबत, पानी बोतल, शीत पेय, अल्पोहार वितरित करुन जल्लोषात स्वागत करण्यात आले. तीन दिवसीय महोत्सवात कन्हान, कांद्री वासी यानी आपुलकी, प्रेम आणि सेवाभाव संगम साधत धार्मिक वातावरणात शांततेत महोत्सव संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती कन्हान-कांद्रीचे पदाधिकारी, सदस्य आणि शहरवासीयांनी अथक परिश्रम घेतले.