spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिबट्याच्या हल्ल्यात तीन बकऱ्या ठार

खापा :- खापा वन विभागाअंतर्गत राम डोंगरी शिवारात शेतातील गोठ्यातील तीन बकऱ्या वर बिबट्याने हल्ला केला असता यात तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ला सकाळी उघडकीस आली.

राम डोंगरी शिवारात कमलाबाई बावनकुळे यांचे शेत आहे. शेतातील गोठ्यात बकऱ्या बांधुन होत्या. गुरूवार ला मध्यरात्री बिबट्याने येथील गोठ्यातील बकऱ्यांवर हल्ला केला. यात तीन बकऱ्यांना ठार केले. सकाळी शेतातील गेले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन अधिकारी गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कुथे व वनपाल राऊत यांनी पंचनामा केला. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Popular Articles