spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघाचे वाढते हल्ले ; उपाययोजना शून्यच माजी आमदार डी. मल्लीकार्जून रेड्डी यांची मागणी.

 

सचिन चौरसिया रामटेक ०५  :- तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पवनी, सिल्लारी, देवलापार वनक्षेत्रात मागील वर्षापासुन वाघाच्या हल्यात वाढ झाली. हिंसक प्राण्याचे हल्ले वाढत असुन उपाययोजना शुन्यच आहे.आदिवासी भागात एक वर्षभरात मानवावर वाघांचे मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. त्यात ११ नागरीकांला आपला जीव गमवावा लागला, परंतू पाहिजे त्या उपाययोजना झाल्या नाही. वाघांचे हल्ले थांबविण्याकरिता शासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशी मागणी भाजपाचे माजी आमदार डी मल्लीकार्जून रेड्डी यांनी पत्रपरीषदेत केली. व तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री व वनमंत्र्यांना देणार असल्याची माहिती दिली. या भागात मानवावरील व प्राण्यावरील हल्ले थांबलिण्याकरिता जंगलाला आवार भिंत, शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री देणे गरजेचे आहे. आवार भिंत ही कमीत कमी १२ फुट व त्यावर वरच्या भागात तीन फुटाचे काटेरी तारेचे कुंपन असने आवश्यक आहे. त्याकरिता राज्य शासनाने केंद्र शासनाची मदत घ्यायला हवी आहे. याआधी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असतांना याबाबत अनेक मागण्या त्यांनी नंजूर केल्या होत्या परंतू त्यातील अनेक अपूर्णच आहेत. काही ठिकाणी शेताला कंपाउंट करण्यात आले परंतू त्याचा प्रत्यक्षात लाभ नेत्यांच्या जवळच्यानीच घेतला असेही दिसुन आहे. यावेळी जिल्हा महामंत्री उदयसिंग यादव,मंडळ अध्यक्ष राज हरणे, माजी मंडळ अध्यक्ष हेमंत जैन, संजय गुप्ता, नितेश ब्रम्हनोटे आदी उपस्थीत होते. यावेळी उदयसिंग यादव यांनी ए आय वर्चुवलवॉल निर्मिती करावी जेणेकरून वाघांचे लोकेशन कळेल व नागरीक जागृत होईल व या घटना घडणार नाही. गुराख्यांना सुरक्षेकरिता याेग्य साहित्य तसेच वाघांचा वावर आहे अशा ठिकाणी शेतात काम करीत असतांना वनविभाग तसेच पोलीसांचे संरक्षण असावे असे सांगीतले.

सुविधा निर्मान करणे गरजेचे..

याशिवाय ताडोबा प्रमाणे कृत्रीम बुद्धीमत्ता असलेले आभासी कुंपन जंगल परिसरातील नागरीकांना विशेष निधी उपलब्ध करून वाघांच्या संरक्षण व जनजागृती करणे. बाधीत लोंकांना जनजागृती करिता सहकार्याची भूमिका बजावण्याकरीता विशेष निधी उपलब्ध करून रोजगार निर्मिती करणे. या प्रकारच्या सुविधा निर्मान करणे गरजेचे असल्याचे बोलल्या गेले.

केवळ कागदी घोडे नाचवण्यात..

बिबटे व वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. वाघ व बिबट्याचा हा प्रवास रामटेक तालुक्यात चांगलाच स्थिरावला असून पाळीव प्राण्यांवर व मानवावर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. वनविभागाचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात दंग आहेत. आम्ही प्रस्ताव पाठवण्याचे काम केले असे सांगून वेळ मारून नेली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.