नागपूर :- तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे शिवजयंती उत्सव-२०२६ व मान्यवरांच्या सत्कार सोहळा रविवारी १ मार्चला तिरळे कुणबी सेवा मंडळ, टाऊन हॉल, आशिर्वाद नगर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमांत प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे ह्यांचे “मिशन आय.ए.एस” ह्यावर प्रबोधन झाले. त्यांनी आय.ए.एस.ची परिक्षा मराठीत देता येते, सातत्याने दररोज संभावित प्रश्नांचा सराव केल्यास हमखास यशस्वी होता येते असे प्रतिपादन केले. विलास इंगोले ह्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन आजच्या परिस्थितीत कोणत्या पध्दतीने अंगीकारावा” ह्यावर उद्बोधन करतांना विदीत केले की, शिवाजी महाराजांनी त्याकाळी स्वराज स्थापन व आदर्श राज्यपध्दती प्रस्थापित केली त्यातून आजच्या समाजाने सुध्दा मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार, दृष्टीकोन ठेवून आताच्या परिस्थितीत स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी सेवावृत्ती बाळगून यशस्वी होईल असा विचार रुजवावा. याप्रसंगी महापौर निता ठाकरे यांचा तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे व विविध कुणबी संघटना (तिरळे कुणबी समाज, बहुउद्देशिय तिरळे कुणबी संघ, बावणे कुणबी समाज, अखिल तिरळे कुणबी समाज, खैरे कुणबी समाज यांचेतर्फे सत्कार करण्यात आला. महापौरांनी समाजासाठी त्यांचेकडून जास्तीत जास्त सहकार्य व मदत देण्याची हमी दिली. मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग वाकडे पाटील यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या योजनांची व सद्यस्थितीची माहिती सादर केली व ह्या सभागृहाचे काम लवकरच पूर्ण करुन “लोकार्पण” करण्यात येईल. असा विश्वास व्यक्त केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा व समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नरेशचंद्र काठोळे, अविनाश कातडे, मोरेश्वर बरडे, घनश्याम मांगे, भागीरथ धोटे, प्रणाली राऊत, प्रल्हाद गावंडे, किसन गांवडे, डॉ.आशिष तायवाडे, साधना बरडे, रितेश पांडे, आशिष गांजरे, गजानन महाले, रत्नाकर राऊत, विलीन खडसे यांना सन्मानित करण्यात आले. यशस्वितेसाठी महादेवराव बोराडे, दिपक कापसे, नितीन हांडे, मधुकर घाटे, प्रज्योत ढोक, रमेश काकडे, विमल वाघमारे, बबनराव गांजरे, अमित पिचकाटे, अनिता वाकडे, रुपाली पिचकाटे, वैशाली काळे, रमेश टाले, नरेश वसु, सवाई, भगवान पिचकाटे, रविन्द्र महाले यांनी खूप परिश्रम घेतलेत. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे वाकडे (पाटील) यांनी कळविले आहे.
तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे शिवजयंती उत्सव-२०२६ व मान्यवरांचा सत्कार सोहळा हर्षोल्हासात साजरा


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



