नागपूर :- विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकारातील जैवतंत्रज्ञान (Biotechnology) विभागाची एक प्रमुख राष्ट्रीय संस्था १९८६ मध्ये राष्ट्रीय कोशिक विज्ञान केंद्र, पूणे येथे आचार्य पदवीच्या संशोधनाकरिता यश रुपाली कल्याण साखरकर ची निवड झाली आहे आणि या संस्थेत २ मार्च २०२६ रोजी रुजू होत आहे. यश साखरकर ने राष्ट्रीय कोशिक विज्ञान संस्थेत प्रवेशाकरिता कुटुंबातील शैक्षणिक व संशोधनात्मक पर्यावरण उत्तरदायी आहे. यांशिवाय राष्ट्रीय पात्रता परीक्षा, ज्युनियर रिसर्च फेलोशिप व आयसर तिरुपतीतील जैविक तथ्य विज्ञानातील पदव्युत्तर पदवी चे शिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. यश साखरकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अमरावती चे सहसचिव डॉ.कल्याण साखरकर व डॉ.रुपाली साखरकर यांचा मुलगा आणि आचार्य पदवीचे संशोधक शाश्वत साखरकर चा लहान भाऊ आहे.








