spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तिरोडा रास गरबा उत्सव उत्साहात संपन्न, पाच दिवसांच्या वैविध्यपूर्ण थिमने केली धमाल!

तिरोडा :- तिरोडा शहरात नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वावर कृष्णा डान्स स्टुडिओ तिरोडा द्वारा आयोजित ‘तिरोडा रास गरबा उत्सव’ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. दिनांक २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ या पाच दिवसांच्या कालावधीत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विविध थिम्सच्या माध्यमातून गरबा प्रेमींनी धमाल केली.

या पाच दिवसीय महोत्सवाच्या आयोजनात कृष्णा डान्स स्टुडिओने दररोज एक नवी थिम ठेवून कार्यक्रमात रंगत आणली.

*पहिला दिवस (२३ सप्टेंबर): उत्सवाचे थाटात उद्घाटन झाले आणि पहिल्याच दिवशी ‘गरबा नाईट विथ गरबा ड्रेस’ थिममध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरब्याला सुरुवात झाली.

* दुसरा दिवस (२४ सप्टेंबर): या दिवशी ‘गरबा विथ महाराष्ट्रीयन लूक अँड पगडी’ थिमने महाराष्ट्रीयन संस्कृतीची झलक दाखवली. सहभागींनी पारंपरिक पोशाख आणि पगडी परिधान करून गरबा सादर केला.

* तिसरा दिवस (२५ सप्टेंबर): तिसऱ्या दिवसाची थिम ‘गरबा श्याम गुणगान राधाकृष्ण थिम’ अशी होती, ज्यात राधा-कृष्णाच्या भक्तीमय वातावरणात गरबा करण्यात आला.

* चौथा दिवस (२६ सप्टेंबर): या दिवशी ‘गरबा विथ साउथ इंडियन लूक अँड ड्रेस’ या अनोख्या थिममध्ये दाक्षिणात्य वेशभूषेची छटा पाहायला मिळाली.

* पाचवा आणि शेवटचा दिवस (२७ सप्टेंबर): उत्सवाचा समारोप ‘गरबा विथ बॉलीवूड रेट्रो थिम’ ने झाला. जुन्या बॉलीवूड गाण्यांच्या तालावर गरबा खेळण्याचा आनंद सहभागींनी लुटला.

*स्थलांतरित कार्यक्रम, उत्साह कायम*

उत्सवाच्या सुरुवातीचे तीन दिवस (२३,२४ व २५ सप्टेंबर) प्रेमबंधन लॉन तिरोडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे आलेल्या व्यत्ययामुळे आयोजकांना तात्काळ निर्णय घेत उर्वरित दोन दिवसांचा (२६ व २७ सप्टेंबर) कार्यक्रम अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित करावा लागला. स्थळ बदलले असले तरी सहभागींच्या उत्साहात तिळमात्र कमतरता जाणवली नाही.

या पाच दिवसीय उत्सवात महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दररोजच्या वेगळ्या थिमला प्रतिसाद देत त्यांनी अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा गरबा सादर करून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. कृष्णा डान्स स्टुडिओच्या यशस्वी आयोजनामुळे तिरोडा रास गरबा उत्सव शहरासाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

Popular Articles