spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजनी ग्रामपंचायत सरपंचाने दिला ग्रामस्थांसमोर लिखित राजीनामा 

कामठी :- नऊ सदस्यीय असलेल्या आजनी ग्रामपंचायतचे सरपंच संजय आसाराम जीवतोडे यांनी स्वतःची मानसिक स्थिती योग्य नसल्याने गावाचा विकास करण्यात अडसर ठरत आहे.त्यामुळे आज सकाळी 11 वाजे दरम्यान ग्रा प कार्यालयात येऊन समस्त ग्रामस्थासमोर स्वेच्छेने लिखित राजीनामा दिल्याने गावात सर्वत्र हा राजीनामा एकच चर्चेचा विषय ठरला आहे.मात्र बातमी लिहिस्तोवर हे राजीनामा पत्र संबंधित गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांच्याकडे सुपूर्द झाले नव्हते त्यामुळे यांचा राजीनामा अधिकृत स्वीकृत झालेला नाही हे इथं विशेष! प्राप्त माहितीनुसार सदर सरपंच संजय जीवतोडे यांच्यावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवून सरपंच पदाचा मान दिला मात्र सरपंच संजय जीवतोडे हे ग्रामस्थांना सरपंच पदाची सेवा देण्यात असमर्थ ठरत आहेत त्यातच काल एका गावकऱ्याने संबंधित प्रमा णपत्रावर लागणाऱ्या सही शिक्क्यासाठी सरपंच महोदयांनी त्या गरजू ग्रामस्थाला मी खैरी ला आहे, नंतर तहसील ला आहे असें सांगून टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येते.यावरून आज ग्रामस्थानी संतापून सरपंचाला ग्रा प कार्यालयात बोलावून सरपंच पदाची सेवा देण्यात आपण अकार्यक्षम असल्यामुळे स्वेच्छेने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आले यावर सरपंच महोदयाने आपली मानसिक स्थिती योग्य नसल्याचे दर्शवून स्वेच्छेने ग्रामस्थांसामोर गटविकास अधिकारी च्या नावाने सरपंच पदाचा राजीनामा पत्र लिहून दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.