spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घिवारी मंदिर येथे तोंडलीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट व वनभोजन संपन्न

किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडली येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट व वनभोजनाचा उपक्रम नुकताच घिवारी मंदिर परिसरात उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवाधारित शिक्षणाचा आनंद घेतला.

क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी घिवारी मंदिराचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. मंदिरातील पुजाऱ्यांकडून विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली तसेच भक्तांकडून मंदिराविषयीची सविस्तर माहिती मिळवली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्याला व निरीक्षण क्षमतेला चालना मिळाली.

शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे तसेच सहशिक्षक निलेश जाधव हे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता व समस्या निराकरण यांसारखी कौशल्ये विकसित करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या स्वयंपाकी अनिता धांडे तसेच पालक वर्गातून निशा कातोरे, ललिता कातोरे व कार्तिक ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे अनुभवाधारित शिक्षण समृद्ध होत असून त्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.