Home Latest News बारावी बोर्डाच्या परिक्षेत खापा शहरातुन अव्वल विद्यार्थिनीचा सत्कार

बारावी बोर्डाच्या परिक्षेत खापा शहरातुन अव्वल विद्यार्थिनीचा सत्कार

0
2

खापा, वार्ताहर :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात खापा शहरातील जवाहर महाविघालयातील विधार्थीनी किर्ती नरेन्द्र हांडे हिने बारावीला विज्ञान शाखेतून ८६.१७ टक्के गुण मिळवत शहरात अव्वल स्थान पटकावले आहे. या यशाबद्दल नगराध्यक्ष पियुष बुरडे व उपाध्यक्ष सुनिल पाहुणे तसेच शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे यांनी किर्ती हिच्या घरी जाऊन या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक करीत सत्कार केला. यावेळी किर्तीच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या किर्तीने यशाचे श्रेय शिक्षक, पालक व आपले मार्गदर्शकांना देत त्यांचे आभार मानून धन्यवाद दिले.

किर्तीचे वडील हे एक छोटीशी किराणा दुकान चालवितात. त्यातच घरची परिस्थिती ही हलाकीची आणि या परिस्थितीत सावरत तिने परिश्रम घेत बोर्डाच्या परीक्षेत भरभराटून यश मिळवले. तिने ठाम विश्वास दर्शविला की ती या हलाकीच्या परिस्थितीतही सर्व गोष्टींना मात करीत भविष्यात अशाच प्रकारे यश संपादन संपादन करेल.