– आज ही पारंपारिक लोककलावंताची लोक कला जोपसण्याचे निरंतर कार्य सुरू
कन्हान :- सार्वजनिक मंडई उत्सव समिती हनुमान मंदिर चौक, टेकाडी (को.ख.) आणि सांस्कृतिक मंडई उत्सव मंडळ महाजन नगर, टेकाडी याच्या व्दारे टेका डी गावात दिवाळीच्या पंचमी ला सार्वजनिक मंडई उत्सव साजरा करित पारंपारिक लोककलावंताची लोककला जोपसण्याचे कार्य निरंतर करण्यात येत आहे.
शनिवार (दि.२५) ला सार्वजनिक मंडई उत्सव समिती हनुमान मंदिर चौक, टेकाडी (को.ख.) येथे रात्री ९ वाजता हनुमान दंडार कलापथक टेकाडी यांच्या तर्फे प्रस्तुत दंडार शाहिर ईश्वर जर्वेकर साथी गंगाधर, भोजराज, अशोक, अनिल सह संच बंडु, मनोहर, सुर्यभान, नागोराव, घर्मराज, आयुष व मनिष पार्टी सहित रात्री दंडारीने समाज प्रबोधत्माक कार्यक्रम करून पारंपरिक मंडई उत्सवाची सुरूवात करण्यात आली. तसेच सांस्कृतिक मंडई उत्सव समिती टेकाडी व्दारे हुड मौहल्ला दर्ग्या जवळ एवन स्ट्रार लावणी चा कार्यक्रम करण्यात आला.

रविवार (दि.२६) ला सकाळी १० वाजता हनुमान मंदीर टेकाडी येथे तुर्रा पार्टीचे शाहिर बुधा, श्याम, साथी अण्णा मु. दहेगाव जि. भंडारा विरूध्द कलंगी पार्टी चे शाहिर व्यकटराव, राजु साथी अण्णा मु. मोहाडी जि नागपुर यांचा शान दार दुय्यम खडा तमाशा दिवसभर आणि रात्री ८ वाजे पर्यंत अंधश्रध्दा, वाईट रूढी, प्रथा, संस्कृती, स्वच्छता, सामाजिक न्याय या जनकल्याण विषयावर गाण्याच्या माध्यमातुन प्रश्नोत्तराच्या माध्यमातुन लोकांचे मनोरंज त्माक प्रबोधन करून उपस्थिताना मंत्रमृग्ध केले. तसे च महाजन नगर टेकाडी येथे सार्वजनिक सांस्कृतिक मंडई उत्सव मंडळ वार्ड क्र २ टेकाडी व्दारे कलंगी पार्टीचे शाहिर कवी ज्ञानेश्वर वाघमारे विरूध्द सुभान पार्टीचे शाहिर राजहंस देवगडे यांच्या खडी गम्मत दुय्यम तमाशा कार्यक्रमातुन उपस्थिताना शाहिर आणि संचानी आपल्या कलागुणाने आकर्षित करून मंत्रमु ग्ध करित समाज प्रबोधन करण्यात आले. यावर्षी लहा न मुलांचे झुले, खेळणे व खाण्याच्या दुकानाची रेलचेल असल्याने परिसरातील मेहुण्यानी, नागरिकांनी आणि ग्रामस्थानी या पारंपारिक मंडई उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. या मंडई उत्सावाच्या यशस्विते करिता समस्थ गावक-यांनी सहकार्य केले.




