– नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले आयोजन
नागपूर :- मानव चेतना जनविकास बहुद्देशिय सेवा संस्था नागपूर निर्मित तसेच धीराल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘तुफान’ एक नशा या हिंदी चित्रपटाचे ट्रेलर लाँन्च केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्रत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच पार पडले़ आजची युवा पिढी व समाजावर हावी होत असलेल्या व्यसनावर थेट भाष्य करणारा हा चित्रपट समाज प्रबोधन व व्यसनमुक्तीच्या दिशेने पडणारे मोेलाचे पाऊल ठरणार आहे असे प्रतिपादन नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी केले़ या चित्रपटात नागपूरा व विदर्भातील १५० हून अधिक कलाकारांनी अभिनय केलेला आहे तर मुख्य भुमिकेत अभिनेता प्रेम धीराल हे आहे़ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहातील पडद्यावर प्रदर्शित होणार असून वैदर्भिय कलावंतांना तसेच या चित्रपटातील वेगळ्या विषयाला नक्कीच प्रेक्षक दाद देतील असा विश्वास निर्माता धनराज हरडे, दिग्दर्शक प्रेम धीराल, मुख्य सल्लागार श्याम थोरात यांनी व्यक्त केला आहे़ तसेच येत्या १५ आॅक्टोंबर रोजी सर्व प्रेक्षकांसाठी सायंकाळी ६ वाजता सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे सर्व प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात येणार असून इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ हा कार्यक्रम निशुल्क असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मानव चेतना जनविकास बहुद्देशिय सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे़.



