spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आदिवासी गोवारी ( गोंड – गोवारी)फाउंडेशन (रामटेक – मौदा – पारशिवनी समाज संघटना) रामटेक तर्फे पवनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात साजरा

किशोर साहू, मौदा :- आदिवासी गोवारी (गोंड – गोवारी) फाउंडेशन (रामटेक -मौदा- पारशिवनी समाज संघटना) रामटेक तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्ग दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव भव्य सत्कार सोहळा रविवार (ता. 21 जून )ला दुपारी 2 वाजता पवनी येथील आदिवासी अपलोना गोंटुल सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जनविकास युवा मंच महाराष्ट्र अध्यक्ष गोपाल वरठी, आदिवासी वार्ताचे संपादक शेखर लसुंते, चिंतामण वाघाडे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव ठाकरे, उद्घाटक अविनाश सोनवणे ,आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाउंडेशन चे अध्यक्ष भास्कर राऊत ,उपाध्यक्ष मनोहर सोनवणे , कोषाध्यक्ष सतीश गाडे,सचिव कृष्णा सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात 114 शहीद बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली , बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसह इतरही मान्यवरांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुसेवाडी येथील वर्ग दहावीत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थिनी वंशिका जगदीश शेंदरे ( 81.80 टक्के) तसेच देवनारा येथील वर्ग बारावीत प्रथम क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी विशाखा बालचंद राऊत ( 87.17 टक्के) सह सर्व दहावी व बारावी वर्ग उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आदिवासी समाजातील संस्कृतीबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मनोज भोंडे यांच्या सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वयोवृद्ध समाज बांधव यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले. कराटे, कबड्डी, खो-खो खेळांमध्ये समाजात आपले नाव लौकिक करणाऱ्या मुला मुलींच्या सुद्धा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या शाल ,श्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी रामटेक येथील शिक्षक जीवन राऊत (सर) यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी आपापल्या भाषणातून विद्यार्थ्यांना समोरच्या वाटचालीसाठी काय करायचे, काय शिकायचे याबद्दल मार्गदर्शन केले . आदिवासी गोवारी (गोंड – गोवारी )फाउंडेशन रामटेक च्यावतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले .वरिष्ठ मान्यवर नेवालाल सहारे , शांताराम राऊत ,संतोष कोहळे यांचे विशेष सत्कार करण्यात आले.

या भव्य सत्कार सोहळ्याला वरिष्ठ समाजसेवक शेषराव नेवारे ,रुपेश राऊत, नीलकंठ अंबाडारे, संजय नेवारे,बलधारी नेवारे, सुमित बोरजे,बाळू सोनवणे, सुनील नेवारे ,उमेश राऊत ,अश्विन राऊत, विनोद कोहळे,आनंद सहारे, बम्हानंद नेवारे,किशोर राऊत, केशव नेवारे, श्रावण पंचभाये,भगवान भोंडे,सतिश राऊत, अनिल ठाकरे,गणेश राऊत ,मंगेश दुधकवरे, राजुबाबा कवरे,उमराव हजारे, दशरथ सरवरे, ॲड.कोहळे ,डाॅ.राऊत सह आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाउंडेशन रामटेक चे सर्व सदस्यगण व समाज बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.