spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपुरात अजनी चौकात राजीव गांधीच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन

नागपूर :- आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवारी दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील अजनी चौकात राजीवजीं च्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी राजीव गांधी यांच्या विचारांना अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांना नमन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विजय सराटकर, ब्लॉक ८ चे अध्यक्ष रवि खडसे, अभिषेक धवड, हेमंत चौधरी, अमर मेढे, प्रणित मोहोड, निलिनी करागडे, रिमा चव्हाण, सुनीत काबडे, मनोज चावरे, अंकित रायकवार, लक्ष्मीकांत तुमसरे, रमण कालेवले, बाबा खुराडे, दिलीप खैरवार, प्रकाश चवरे, विजय भैया कुवंशी, विजय काबडे, आदेश मोहोड, प्रशांत ढाकणे, रामभाऊ कवाडकर, संजय दुधे, रमेश ठाकरे, हरिश्चंद्र पाखमोडे, दिलीप कापसे, राहुल राऊत, मंगेश गुडडे, राज संतापे, मंगेश कामोने, अंकित राहुलकर, राहुल दोडके, राजू गेडाम, अजिंक्य बोडे, शुभम सोनटक्के, रोहित खैरवार, उत्तम खरबडे, कुणाल निमगडे, नकुल अंभोरे, वंश शर्मा, मुकेश शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले.

Popular Articles