नवी दिल्ली :- महानुभाव पंथाचे संस्थापक व आद्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री चक्रधर स्वामी यांना आदरांजली अर्पण केली.





