spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दिवंगत सुप्रसिद्ध चंद्रशेखर पाखमोडेंना श्रद्धांजली रविवारी

नागपूर :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या तर्फे श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम रविवारी 25 जानेवारीला स्व. कुसुमताई बाबुरावजी झाडे सभागृह नवप्रतिभा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयुर्वेदिक ले आउट सक्करदरा नागपूर येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

नागपूर शहरातील सुप्रसिद्ध आणि गरिबांचे कैवारी असलेले न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे आकस्मिक निधन 31 डिसेंबरला झाले होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच विशेष उपस्थिती माजी खासदार रामदास तडस यांची राहतील. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कृष्णा खोपडे, शेखर सावरबांधे, तेली समाज सभेचे अध्यक्ष नाना ढगे, डॉ. कुणाल पडोळे, डॉ. राजेश सावरबांधे, डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर आणि राजेंद्र झाडे यांची उपस्थिती राहतील. श्रद्धांजली सभा दुपारी 2 वाजता. घेण्यात येत असून यावेळी सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे संयोजक बळवंतराव मोरघडे यांनी कळविले आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.