spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’; अवैध रेती वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर जप्त, ५ जणांविरुद्ध कारवाई

– २२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; पवनारा फाटा येथे पोलिसांनी रचला सापळा

हंसराज,भंडारा तुमसर :- तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात तुमसर पोलिसांनी कंबर कसली असून, २० जून रोजी रात्री राबविलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. पवनारा फाटा परिसरात अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले असून, या कारवाईत एकूण २२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, प्रीतम येवले व पोलीस ताफा परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजा पवनारा येथे अवैध रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचासमक्ष पवनारा फाटा येथे सापळा रचला. यावेळी रेतीने भरलेले तीन ट्रॅक्टर येताना दिसले. पोलिसांनी हे ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता,त्यात विनापरवाना अवैध रेती मिळून आली.

या कारवाईत ट्रॅक्टर चालक व मालक अशा पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये रोहन शामा वाघाडे (२०, रा. गर्रा-बघेडा), निखिल राजेश पटले (२७, रा. बघेडा), वीक्की खुशाल वाघडे (२१, रा. मिटेवाणी), शुभम रोशन पटले (२८, रा. मिटेवाणी) आणि अक्षय शिवचरण कटरे (२८, रा. येरली) यांचा समावेश आहे. या सर्वांकडून रेतीसह तीन ट्रॅक्टर असा एकूण २२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक (तुमसर विभाग) मयंक माधव, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, प्रीतम येवले, पोलीस नाईक गणेश मन्नाडे, पोलीस शिपाई विजय दमाहे, अभिषेक घोडमारे यांचा समावेश होता.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले व सयाम करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Popular Articles