सुरज बंडीवार, पांढरकवडा :- कोपामांडवी फाट्याजवळ एका स्कॉर्पिओ कंपनीच्या चारचाकी वाहनांमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून देशी दारूच्या १० पेट्या व एक स्कॉर्पिओ असा एकूण २१ लाख ३८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पांढरकवडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक २० सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजताच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की एका वाहनांमध्ये देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपामांडवी फाट्याजवळ सापळा रचला असता, नविन स्कॉर्पिओ कंपनीच्या विना क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूच्या १० पेट्या आढळून आल्या याप्रकरणी आरोपी अमित मोहन जाधव वय ३० वर्ष, रा. उमरी, संस्कृत दत्तात्रय गटलेवार वय २८ वर्ष राहणार घाटंजी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण २१ लाख ३८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हे देशी दारू कोणत्या दुकानांमधून आली आहे याचा अहवाल संबंधित विभागाला माहितीकरिता पाठवण्यात येणार असल्याचे पांढरकवडा पोलीस स्टेशनचे जमादार राम राठोड यांनी सांगितले आहे.
स्कॉर्पिओ वाहनाने अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



