हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अंकुश माने, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांच्या नेतृत्वात दिनांक ३०/१०/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महावितरणाचे विद्युत लाईनचे ट्रान्सफॉर्मर मधील आईल चोरीचे ०२ गुन्हे उघड करून २१,७५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागातील अउघड गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, पो.स्टे. वडोदा अप. क्र. ४०५/२०२६ कलम ३०३(२) भान्यास या ट्रान्सफॉर्मर आईल चोरीचे गुन्हयामध्ये एका पांढऱ्या रंगाचे एमजी हेक्टर क. ९२८२ वाहनाचा वापर झाला आहे. सदर वाहनाचा आणि आरोपींचा गोपनिय माहीती आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने शिताफीने शोध घेवुन दिनांक ३०/१०/२०२६ रोजी पाटणकर चौक नगर, नागपुर येथे एमजी हेक्टर वाहन क. एम.एच ०५/ई क्यु -९२८२ हे वाहन पकडले. नमुद वाहनात आरोपी क्रं १) रमणदिपसिंग अमृतसिंग रणधावा, वय ४० वर्ष, रा.प्लॉट न. ०३ बाबादिप नगर, गुरूव्दारा जवळ, कपील नगर नागपुर आणि त्याचा साथीदार आरोपी क्रं २) कमल रामस्वरूप शर्मा, वय ५५ वर्ष, रा. प्लॉट नं. १३० बाबाविक्तुनगर, पाटणकर चौक नागपुर हे दोघे मिळुन आले. नमुद आरोपींना कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन वडोदा आणि मौदा हद्दीतुन महावितरणाचे विद्युत लाईनचे ट्रान्सफॉर्मर मधील आईल चोरी केल्याचे व चोरी करून ट्रान्सफॉर्मर मधील आईल हायवे रोडवरील येणारे जाणारे ट्रक वाहन चालकांना विकल्याचे माहीती दिली.
पोलीसांनी पंचासमक्ष गुन्हा करतांना वापरलेले वाहन १) एक एमजी हेक्टर वाहन क. एम.एच ०५ ई क्यु ९२८२ अंदाजे किंमती २०,००,०००/- रूपये, २) २ अॅड्रॉईड मोबाईल किंमती २०,०००/- रूपये आणि ३) ऑईल विकीची रोख रक्कम १,५५,०००/-रूपये असा एकुण २१,७५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे:
१) पोलीस ठाणे वडोदा अप. क्र. ४०५/२०२६ कलम ३०३ (२) भान्यासं
२) पोलीस ठाणे मौदा अप क. ७२१/२०२६ कलम ३०३ (२) भान्यासं








