किशोर साहू, मौदा ,ता. २६ :- दरवर्षीप्रमाणे यंदाही खास कोदवस पंचमी निमित्त बोरी (घिवारी) येथे उद्या बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर पासून नवयुवक मंडळातर्फे दोन दिवसीय मंडळीला सुरुवात होणार आहे.
आज बुधवारला सायं. 7 वाजता मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटनाच्या सोहळा पार पडल्यानंतर रात्री 9 वाजता वस्ताद मु. किन्हाळा, तालुका समुद्रपूर ,जिल्हा वर्धा येथील शाहीर सुभाष मेश्राम, साथीदार सागर मेश्राम यांच्या संपूर्ण पार्टीसह राष्ट्रीय खडा गोंधळ, गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता पासून मुक्काम निलज बुज तालुका मोहाडी ,जिल्हा भंडारा येथील शाहीर राजहंस देवगडे भाऊ कृष्णा, साथी शैलेश यांच्या संपूर्ण पार्टीसह राष्ट्रीय संगीत खडी गमतीचे राष्ट्रीय खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या दोन दिवसीय मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान नवयुवक मंडळ व समस्त ग्रामवासी बोरी( घिवारी) यांनी केले आहे.




