किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही नेरला येथील ग्रामपंचायत पटांगणात सार्वजनिक आखाडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीतर्फे गणराज्य दिनानिमित्त आखाडा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात उद्या सोमवार( दि. 26 जानेवारी)ला करण्यात येणार आहे. मंगळवार 27 जानेवारी ला जुनीवस्ती नेरला येथे क्रांतीज्योती कलंगी मंडळ खंडाळा (निलज) शाहीर सुरज ब्रह्माजी नवघरे विरुद्ध शाहीर राजहंस देवघरे यांच्या दुय्यम खडा तमाशा, नवीन वस्ती नेरला येथे पारडी वग येथील शाहीर निशान सुखदेवे विरुद्ध भागेमहारी येथील शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या राष्ट्रीय संगीत खडीगंमत कार्यक्रम ,रात्री नऊ वाजता नवीन वस्ती नेरला येथे वडसा येथील तीन अंकी नाटक विश्वासघात या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, प्रमुख पाहुणे चंद्रपाल चौकसे ,अमोल देशमुख, कैलास बरबटे, स्वप्निल श्रावणकर, खेमराज चाफले, नंदा लोहबरे, उदयसिंग यादव, देवेंद्र गोडबोले, दुधाराम सव्वालाखे, हर्षवर्धन निकोसे, किशोर गजभिये ,असलम शेख, डॉ. दिनेश बादोले,प्रमोद बरबटे, प्रज्ञा राहुल बावणे, लुमिनी महेश कलारे ,संकेत झाडे, रजत महादुले, लक्ष्मण उमाळे ,संतोष झामतानी, अतुल कोटांगले, नितेश वांगे, रमेश कारेमोरे, नरेंद्र बांधाटे, विजय हटवार, मदन बरबटे, नागेश्वरी मारुती कडू ,रोशन मेश्राम सह गावातील, परिसरातील ,तालुक्यातील, जिल्ह्यातील उद्योजक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या दोन दिवसीय मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान सार्वजनिक आखाडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष पिंटू नाटकर, उपाध्यक्ष ज्ञानी रोहनकर ,सचिव अभिषेक चोपकर ,सदस्य प्रमोद कडू , शुब्बू कडू, प्रफुल लोणकर ,सचिन कारेमोरे, सचिन तिवाडे, शुभम मोहर्ले ,रोशन नाटकर, शुभम पडोळे, विकी पडोळे ,रोहित भिवगडे ,रोशन भिवगडे, मनोहर भिवगडे, अभिषेक दहेलकार व समस्त ग्रामवासी यांनी केले आहे.




