spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तारसा येथे दोन दिवसीय प्रकट दिन महोत्सव उद्यापासून 

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही तारसा येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान येथे आयोजक श्री संत गजानन महाराज देवस्थान पंचकमिटी तर्फे रविवार (दि. 8 फेब्रुवारी)पासून दोन दिवसीय प्रकटदिन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

रविवारला सकाळी नऊ वाजता मूर्तीची विधिवत पूजा, अर्चना व घटस्थापना होईल .पोथीचे पारायण, आरती व सायंकाळी सात वाजता आरती. रात्री नऊ वाजता पासून लक्ष्मीबाई भजन मंडळ तारसा, भजन मंडळ आष्टी व जय बजरंग भजन मंडळ हिवरा यांच्या भजनाच्या कार्यक्रम होईल. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारीला दुपारी तीन ते पाच वाजता ह भ प वंदना ज्ञानेश्वर भोले, नरसाळा यांचे काल्याचे किर्तन होईल . दुपारी पाच वाजता पासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या भाविक भक्तांनी तन मन धनाने स्वतः येऊन लाभ घ्यावा व सहकार्य करण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.