Home Latest News श्री शनी जयंती निमित्त दोन दिवसीय कार्यक्रम

श्री शनी जयंती निमित्त दोन दिवसीय कार्यक्रम

0
3

सचिन चौरसिया, रामटेक :- किट्स कॉलेज जवळ असलेल्या श्री संकट मोचन शनिदेव सेवा समितीच्या वतीने येत्या १५ व १६ मे दरम्यान श्री शनी जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असून दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. १५ मे ला सायं. ६ वा. हरीओम बाल भजन मंडळ, रामटेक यांचा भजन कार्यक्रम व सायं. ७ वा. शनि मंदिर सेवा समिती च्या वतीने आरती करण्यात येईल. सायं. ७.३० वाजता अशोकर हांडे यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. १६ मे ला सकाळी ८ वाजता रवींद्र तांदूळकर व सोनू तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक व आरती होणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता सार्वजनिक हवन पुजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.०० वाजता महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पाहुणे म्हणून रामटेक नगर परिषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन हे उपस्थीत राहतील. महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता पासून भाविकांना महाप्रसाद वितरित केला जाईल. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.